आयओए व क्रीडा महासंघांनी सर्व माहिती सार्वजनिक करावी : मंत्रालय
By Admin | Updated: March 3, 2015 01:01 IST2015-03-03T01:01:11+5:302015-03-03T01:01:11+5:30
क्रीडा मंत्रालयाने भारतीय आॅलिम्पिक संघटना आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांना आपल्या कार्याची पद्धत व अर्थकारण यांची आॅनलाईन माहिती देणे अनिवार्य केले आहे.

आयओए व क्रीडा महासंघांनी सर्व माहिती सार्वजनिक करावी : मंत्रालय
नवी दिल्ली : क्रीडासंस्थांच्या कार्यामध्ये पारदर्शकता आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या क्रीडा मंत्रालयाने भारतीय आॅलिम्पिक संघटना आणि राष्ट्रीय क्रीडा महासंघांना आपल्या कार्याची पद्धत व अर्थकारण यांची आॅनलाईन माहिती देणे अनिवार्य केले आहे. यात टाळटाळ करणाऱ्या महासंघांच्या मान्यतेबाबत पुनर्विचार करण्यात येईल, असे मंत्रालयाने
स्पष्ट केले. मंत्रालयाने आयओए
व क्रीडा महासंघांना पत्र
पाठविले असून, दिलेले निर्देश
भारतीय राष्ट्रीय क्रीडा विकास आचारसंहिता २०११ चा भाग असल्याचे स्पष्ट केले.
मंत्रालयाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की ‘अनेक राष्ट्रीय क्रीडा महासंघांतर्फे मंत्रालयाला आवश्यक माहिती देण्यात येते; पण अनेक महासंघांच्या वेबसाईटवर ही माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे सामान्य नागरिक व संबंधितांना आवश्यक माहिती उपलब्ध होत नाही.’
क्रीडा मंत्रालयाने न्यायालयाच्या सूचनेचा आदर करताना, आयओए व राष्ट्रीय क्रीडा महासंघांनी सर्व माहिती वेबसाईटवर उपलब्ध करावी, क्रीडा महासंघांनी अंकेक्षण अहवालासह बँक खात्याचे जमाखर्च विवरणपत्र ३० जूनपर्यंत वेबसाईटवर उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना केली आहे. खात्याचे आॅडिट व जमाखर्च विवरणपत्र ३० जूनपर्यंत वेबसाईटवर लोड करणे अशक्य असल्याचे महासंघांनी मंत्रालयाला कळविले आहे.
आयओए व राष्ट्रीय क्रीडा महासंघांनी गेल्या आर्थिक वर्षाचा बँक खात्याचा तपशील वेबसाईटवर ३१ डिसेंबरपर्यंत उपलब्ध करावा, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
(वृत्तसंस्था)
च्भारतीय बॅडमिंटन महासंघ आणि युनियन बँक आॅफ इंडिया यांच्याबाबतच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने राष्ट्रीय क्रीडा महासंघातर्फे माहितीच्या अधिकाराच्या नियमानुसार माहिती उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचे म्हटले आहे.
च्न्यायालयाने २४ डिसेंबर २०१४ रोजी दिलेल्या निर्णयात राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या कारभारावर भारत सरकारने लक्ष ठेवावे, असे म्हटले होते.