शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धा : भारताच्या झहीर, निशांत, पीटर, संदीप यांची आगेकूच 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 5:42 PM

आंतरराष्ट्रीय कॅरम  फेडरेशन  चषक स्पर्धेच्या ‘स्विस लीग’ पद्धतीच्या एकेरी गटात जहीर पाशा, संदीप दिवे (भारत), पीटर भोकर (जर्मनी), निशांत  फर्नांडो (श्रीलंका) यांनी प्रथम फेरीमध्ये चमकदार सहज विजय मिळवीत आगेकूच केली. या स्पर्धेला सोळा देशांतून शंभर खेळाडू आणि अधिकारी यांचा उस्फुर्त सहभाग लाभला आहे.

भारतीय आर्युविमा महामंडळ व ओ एन जी सी पुरस्कृत महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या यजमान पदाखाली आयोजित करण्यात आलेल्या आठवा आंतरराष्ट्रीय कॅरम  फेडरेशन  चषक स्पर्धेच्या ‘स्विस लीग’ पद्धतीच्या एकेरी गटात जहीर पाशा, संदीप दिवे (भारत), पीटर भोकर (जर्मनी), निशांत  फर्नांडो (श्रीलंका) यांनी प्रथम फेरीमध्ये चमकदार सहज विजय मिळवीत आगेकूच केली. या स्पर्धेला सोळा देशांतून शंभर खेळाडू आणि अधिकारी यांचा उस्फुर्त सहभाग लाभला आहे.

‘स्विस लीग’ पद्धतीच्या प्रथम फेरीत भारताच्या प्रशांत मोरे याने यू. एस. ए. च्या अजय अरोरा वर विजय मिळविताना २५-१७ अशी झुंझ द्यावी लागली. या सामन्यात सहाव्या बोर्डमध्ये अजय अरोरा ने स्पर्धेतील पहिली ब्रेक टू फिनीश ची नोंद केली. भारताच्या संदीप दिवे ने एकतर्फी झालेल्या सामन्यात मालदिवच्या अजमीन इस्माईल चा २५-० ने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेतील दूसरी ब्रेक टू फिनीश नोंद करून मात केली. भारताच्या जहीर पाशा ने एकतर्फी रंगलेला सामना मालदिवच्या आदील आदम चा २५-७ असा पराभव करताना ब्रेक टू फिनीशची नोंद केली.

फ्रान्सच्या डूबियोस पीयरे ने एकतर्फी झालेल्या सामनयात भारताच्या गीता देवीचा २५-४ पराभव करून आगेकूच केली. भारताची विश्‍वविजेती एस. अपूर्वा ने कॅनडाच्या डंगोई रूपकि‘श्‍नावर २५-१ असा विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले.

 महत्वपूर्ण निकालस्विस लीग  - प्रथम फेरीके. श्रीनिवास (भारत) वि. वि. अबु बाकर मोहंमद युनुस (मलेशिया)- २५-०जहीर पाशा (भारत) वि. वि. आदील आदम (मालदिवस)- २५-७निशांत फर्नांडो (श्रीलंका) वि. वि. इर्शाद एहमद (भारत)- २५-१२रश्मि कुमारी (भारत) वि. वि. अलि नाहर (यु.ए.ई)- २५-०प्रशांत मोरे (भारत) वि. वि. अजय अरोरा (यु.एस.ए)- २५-१७रहमान हाफिजूर (बांग्लादेश) वि. वि. आजम खान मोहंमद (यु.ए.इ)- २५-१काजल कुमारी (भारत) वि. वि. चदनी रैमा (बांग्लादेश)- २५-०शहिद इलमी (श्रीलंका) वि. वि. अहमद अनास (श्रीलंका)- २५-०महंमद अहमद मुल्ला (बांग्लादेश) वि. वि. रेबेका दलराईन (श्रीलंका)- २५-५एस. अपूर्वा (भारत) वि. वि. डंगोई रूपकि‘श्‍ना (कॅनडा)- २५-१डूबियोस पीयरे (फ्रान्स) वि. वि. गीतादेवी (भारत)- २५-४संदीप दिवे (भारत) वि. वि. अजमीन इस्माईल (मालदीव)- २५-०राजेश गोईल (भारत) वि. वि. कैसर सलाउद्दीन (बांग्लादेश)- २५-८इस्माईल अब्दुल मुतालिब (मलेशिया) वि. वि. नजरूल इस्लाम (यू.के)- २५-७पीटर बोकर (जर्मन) वि. वि. मकसूदा शूमसाने नहार (बांग्लादेश)- २५-१  

टॅग्स :Indiaभारत