विराट व धोनीकडून प्रेरणा घेतो- हार्दिक

By Admin | Updated: October 25, 2016 19:33 IST2016-10-25T19:33:05+5:302016-10-25T19:33:05+5:30

दडपणाच्या स्थितीत चमकदार कामगिरी करण्याची प्रेरणा महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्याकडून मिळते, अशी प्रतिक्रिया हार्दिक पांड्याने व्यक्त केली.

Inspired by Virat and Dhoni - Hardik | विराट व धोनीकडून प्रेरणा घेतो- हार्दिक

विराट व धोनीकडून प्रेरणा घेतो- हार्दिक

ऑनलाइन लोकमत 

रांची, दि. 25 - दडपणाच्या स्थितीत चमकदार कामगिरी करण्याची प्रेरणा महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्याकडून मिळते, अशी प्रतिक्रिया हार्दिक पांड्याने व्यक्त केली. 
रांचीमध्ये खेळल्या जाणा-या चौथ्या वन-डे सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना पांड्याने आपल्या सिनिअर खेळाडूंची प्रशंसा केली. तो म्हणाला,‘धोनी व कोहली फलंदाजी करीत असताना बरेच काही शिकायला मिळते. त्यांची फलंदाजी आणि धावा पळण्याची क्षमता प्रेरित करणारी असते. त्यांना एकत्र फलंदाजी करताना बघणे आनंददायी असते.’ 
पांड्या पुढे म्हणाला,‘धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे सकारात्मक बाब आहे. मोहालीमध्ये धोनीच्या फलंदाजीचा आनंद घेतला. फलंदाज म्हणून कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची तयारी असून परिस्थितीनुसार फलंदाजी करणे आवश्यक असते.’
धर्मशालामध्ये पदार्पणाची लढत खेळताना पांड्याने सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. पांड्या म्हणाला,‘मी फिट असलो तरी त्यावर अधिक मेहनत घेत आहे.’
दिल्लीमध्ये ३२ चेंडूंना सामोरे जाताना ३६ धावांची खेळी करीत पांड्याने भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या, पण अखेर बोल्टच्या आखुड टप्प्याच्या चेंडूवर तो बाद झाला. 
पांड्या म्हणाला,‘मी यापूर्वीही हा फटका खेळला आहे, पण तो दिवस माझा नव्हताच. मी या चुकीची पुनरावृत्ती करणार नाही. अनुभवातून बरेच काही शिकायला मिळते. विराट फॉर्मात असला तर संघाचे मनौधैर्य उंचावलेले असते. तो जर लवकर बाद झाला तर संघावर दडपण येते, हे निश्चित.’

Web Title: Inspired by Virat and Dhoni - Hardik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.