लाहोर आत, मुंबई बाहेर
By Admin | Updated: September 17, 2014 02:09 IST2014-09-17T02:09:55+5:302014-09-17T02:09:55+5:30
चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पध्रेतील मुंबई इंडियन्सचा प्रवास क्वालिफायर फेरीतच संपुष्टात आला.

लाहोर आत, मुंबई बाहेर
रायपूर : चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पध्रेतील मुंबई इंडियन्सचा प्रवास क्वालिफायर फेरीतच संपुष्टात आला. लाहोर लायन्सने एक्स्प्रेसवर विजय साजरा करून इंडियन्सचा मुख्य फेरीतील मार्ग अधिक खडतर बनवला होता. या आव्हानाचा सामना करण्याऐवजी इंडियन्स डगमगले आणि नॉर्दर्न डिस्ट्रिक्टविरुद्ध त्यांना सहा विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या पराभवाने इंडियन्सला स्पध्रेतून गाशा गुंडाळायला लागला. आता मुख्य फेरीतील अखेरचे दोन संघ म्हणून नॉर्दर्न आणि लाहोर लायन्स यांनी एन्ट्री मिळवली आहे.
नाणोफेक जिंकून नॉर्दर्नने मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. आपली गोलंदाजी भक्कम आणि अचूक आहे याची खात्री त्यांना असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. त्याला यश मिळवून दिले ते स्कॉट स्टायरिश आणि टीम साऊथी यांनी. या दोघांच्या भेदक मा:यासमोर इंडियन्सचे फलंदाज लडखडले. सलामीवीर लेंडल सिमन्स आणि मायकल हसी हे कोणताही करिष्मा न दाखवता माघारी परतले. चौथ्याच षटकात साऊथीने हसीला बाद करून इंडियन्सचे स्मीथ हिरावून घेतले. त्यानंतर इंडियन्सची पडझड सुरू झाली आणि त्यांचे 5 फलंदाज अवघ्या 46 धावांत माघारी परतले. स्टायरिशने पाचपैकी तीन फलंदाजांना बाद करून आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध केली. कर्णधार किरॉन पोलार्ड अखेरच्या षटकात फटकेबाजी करून संघाला मोठी धावसंख्या गाठून देईल, अशी आशाही फोल ठरली. त्याला 24 चेंडूंत 31 धावाच करता आल्या. त्यात दोन चौकार आणि एक षट्काराचा समावेश होता. हरभजन सिंगही स्वस्तात बाद झाल्याने मुंबई शंभरी पार करणार का? हा प्रश्न उपस्थित राहिला, पण o्रेयस गोपाल आणि लसिथ मलिंगा यांनी सहाव्या विकेटसाठी 29 धावा करून संघाला 132चा पल्ला गाठून दिला.
मुंबईला कमी धावांत रोखून नॉर्दर्न संघाने आपला विजय निश्चित केला आणि मुंबईला घरचा रस्ता दाखवला. तरीही विजय खेचून आणण्यासाठी मुंबईची धडपड सुरूच होती. सलामीवीर अॅन्टॉन देवसिच आणि केन विलियन्सन यांनी संघाला 83 धावांची दमदार भागीदारी करून दिली. हरभजन सिंगने दहाव्या षटकात देवसिच याला बाद केले खरे, परंतु तोर्पयत सामना हातातून निसटला होता. विलियन्सनने 36 चेंडूंत 7 चौकार व 1 षट्कार खेचत 53 धावा केल्या आणि नॉर्दर्न संघाला विजयाच्या उंबरठय़ावर आणून
ठेवले. नॉर्दर्न संघाने ही लढत 17.2 षटकांत 4 विकेट्सच्या मोबदल्यात जिंकून मुख्य फेरीत ऐटीत प्रवेश केला.
(वृत्तसंस्था)
मुंबई इंडियन्स : सिमन्स त्रि. गो. स्टायरिश 13, हसी झे. कुग्गेलेंजीन गो. साऊथी 7, सक्सेना झे. विलियन्सन गो. स्टायरिश 1क्, रायडू झे. वॉटलिंग गो. बोल्ट 6, तरे झे. वॉटलिंग गो. स्टायरिश 7, पोलार्ड झे. हॅरिस गो. साऊथी 31, हरभजन झे. देवसिक गो. कुग्गेलेंजीन 1क्, गोपाल धावबाद (बोल्ट/वॉटलिंग) 24, मलिंगा त्रि. गो. साऊथी 2क्, ओझा नाबाद 1. अवांतर -3; एकूण - 9 बाद 132 धावा
गोलंदाजी - बोल्ट 4-क्-21-1, साऊथी 4-क्-14-3, कुग्गेलेजीन 4-क्-4क्-1, स्टायरिश 4-क्-21-3, सोधी 4-क्-25-क्.
नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट : देवसिक झे. पोलार्ड गो. हरभजन 39, विलियन्सन झे. पोलार्ड गो. बुमराह 53, फ्लॅन झे. हरभजन गो. ओझा 13, वॉटलिंग झे. हरभजन गो. बुमराह क्, मिचेल नाबाद 16, स्टायरिश नाबाद 3. अवांतर - 9; एकूण 4 बाद 133 धावा
गोलंदाजी - मलिंगा 4-क्-31-क्, बुमराह 4-क्-26-2, हरभजन 4-क्-29-1, ओझा 3.2-क्-23-1, सक्सेना 2-क्-21-क्.