जखमी करुणारत्ने वर्ल्डकपमधून बाहेर
By Admin | Updated: March 5, 2015 23:29 IST2015-03-05T23:29:37+5:302015-03-05T23:29:37+5:30
श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज दिमुथ करुणारत्ने दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे़ त्यामुळे रविवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या लढतीपूर्वी लंकेला मोठा धक्का बसला आहे़

जखमी करुणारत्ने वर्ल्डकपमधून बाहेर
कोलंबो : श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज दिमुथ करुणारत्ने दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर झाला आहे़ त्यामुळे रविवारी आॅस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या लढतीपूर्वी लंकेला मोठा धक्का बसला आहे़
बोटाला झालेल्या दुखापतीमुळे आता लंकेचा हा सलामीवीर फलंदाज वर्ल्डकपमधील पुढच्या सामन्यांत खेळू शकणार नाही़ करुणारत्नेच्या बोटाचा एक्स-रे केला असता यामध्ये फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ आता करुणारत्ने मायदेशी परतणार आहे़ करुणारत्नेच्या जागी आता संघात सिकुगे प्रसन्ना याला स्थान देण्यात आले आहे़ श्रीलंकेचा रंगना हेराथसुद्धा दुखापतग्रस्त आहे़ तो जर आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापर्यंत फिट होऊ शकला नाही, तर कुशल परेरा याला संधी देण्यात येईल़