शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
3
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
4
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
5
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
6
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
7
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
8
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
9
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
10
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
11
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
12
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
13
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
14
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
15
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
16
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
17
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
18
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
19
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
20
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण

इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: किरण जाॅर्जने पटकावले विजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 9:11 AM

Indonesia Masters Badminton Tournament: भारतीय बॅडमिंटन क्षेत्रातील उगवता तारा किरण जाॅर्ज याने रविवारी पुरुष एकेरीत जपानच्या कू ताकाहाशी याला सरळ गेममध्ये पराभूत करत इंडोनेशिया मास्टर्स सुपर १०० बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकावले. 

मेदान - भारतीय बॅडमिंटन क्षेत्रातील उगवता तारा किरण जाॅर्ज याने रविवारी पुरुष एकेरीत जपानच्या कू ताकाहाशी याला सरळ गेममध्ये पराभूत करत इंडोनेशिया मास्टर्स सुपर १०० बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकावले. जागतिक पातळीवर सुपर १०० पातळीवरील हे किरणचे दुसरे विजेतेपद आहे.

कोच्चीच्या या २३ वर्षीय खेळाडूने ५६ मिनिटे रंगलेल्या लढतीत जगात ८२ व्या क्रमांकावर असलेल्या ताकाहाशी याला २१-१९, २२-२० असे पराभूत केले. बंगळुरूत पीपीबीए येथे सराव करणारा किरण सामन्यात सुरुवातीला १-४ असा पिछाडीवर होता. त्यानंतर त्याने ८-८ अशी बरोबरी साधत आघाडी घेतली. किरणने १८-१५ अशी आघाडी वाढवली. ताकाहाशीने पिछाडी १९-२० अशी कमी केली. त्यानंतर किरणने गेम जिंकत आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्येही दोन्ही खेळाडूंमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. ६-६ अशा बरोबरीनंतर किरणने १६-११ अशी आघाडी घेतली. ताकाहासीने जोरदार पुनरागमन करताना १९-१९ अशी बरोबरी साधली. किरण यावेळी पहिला मॅच पाॅइंट घेण्यात अपयशी ठरला, पण दुसरा मॅच पाॅइंट घेत त्याने लढत जिंकली. 

माजी राष्ट्रीय विजेता जाॅर्ज थाॅमस यांचा मुलगा असलेल्या किरणने ओडिशा ओपन आणि पोलिस ओपन जिंकली होती. तो गतवर्षी डेन्मार्क मास्टर्समध्ये उपविजेता ठरला होता. यंदा जानेवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम ४३ व्या क्रमांकावर पोहोचलेल्या किरणने मे-जूनमध्ये थायलंड ओपनमध्ये चीनचा आघाडीचा खेळाडू शी युकी आणि वेंग होंगयांग याला पराभूत करत आपले कौशल्य दाखविले होते. 

धक्कादायक निकालांवर द्यावे लक्षप्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीचे संचालक आणि माजी राष्ट्रीय प्रशिक्षक विमल कुमार यांनी सांगितले की, हा विजय शानदार आहे. संधीचे सोने करणे आणि सातत्याने चांगली कामगिरी केल्यावरच असे जेतेपद साकारता येते. देशातील अन्य खेळाडूही युवा आणि चांगले आहेत. त्यामुळे किरणच्या या कामगिरीमुळे खूप आनंद झाला आहे. या विजेतेपदानंतर विश्रांती करण्याऐवजी किरणने तयारी सुरू ठेवायला हवी. कारण तो आता हाँगकाँगच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याच्याकडे गमावण्यासारखे काही नाही. त्यामुळे त्याने उलटफेर करण्यावर लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :BadmintonBadmintonIndiaभारत