शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक मालिका श्रीलंकेत?

By admin | Updated: November 24, 2015 00:22 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका श्रीलंकेत खेळविली जाण्याची आणि त्याची अधिकृत घोषणा २७ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.

दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका श्रीलंकेत खेळविली जाण्याची आणि त्याची अधिकृत घोषणा २७ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे.‘बीसीसीआय’ने याआधीच संयुक्त अरब अमिरात येथे खेळणार नसल्याचे स्पष्ट केले होते, तसेच पाकिस्तान क्रिकेट मंडळानेदेखील भारतात खेळण्यास नकार व्यक्त केला होता. अशा परिस्थितीत दोन्ही देशांदरम्यान श्रीलंकेतील पर्याय उपलब्ध होता.बीसीसीआयच्या उच्च सूत्रानुसार या मालिकेसाठी आता फक्त एक महिना बाकी आहे आणि अशा स्थितीत सुरुवातीचे दोन कसोटी, पाच वन-डे व दोन टी-२0 सामन्यांऐवजी त्यात फक्त तीन वन-डे आणि दोन टी-२0 सामने होण्याची शक्यता आहे.बीसीसीआयचे अध्यक्ष आणि आयसीसीचे विद्यमान चेअरमन शशांक मनोहर, पीसीबी अध्यक्ष शहरयार खान व नजम सेठी यांच्यादरम्यान येथे ईसीबीप्रमुख आणि ‘पाकिस्तान टास्क फोर्स’चे चेअरमन जाइल्स क्लार्क यांच्या उपस्थितीत बैठकीनंतर मालिका आयोजनाच्या प्रक्रियेस वेग आला आहे.सेठी आणि खान यांनी मनोहर यांच्यासोबतची बैठक ‘उपयुक्त’ होती, असे सांगितले होते; मात्र त्यांनी विस्तारात जास्त काही सांगितले नव्हते. त्यामुळे या मालिकेसाठी निर्माण झालेला अडथळा संपला असल्याचे संकेत मिळाले आहेत.सूत्रांनुसार, ‘पीसीबीला अधिकृत घोषणा करण्याआधी नवाज शरीफ यांची परवानगी घेण्याची आवश्यकता आहे. शहरयार खान यांना लाहोर येथे जाऊन पंतप्रधानांची परवानगी घ्यावी लागणार आहे. पंतप्रधानांकडून त्यांना हिरवा कंदील मिळाल्यानंतर ते याविषयी दुबई येथे जाऊन क्लार्क यांना त्यांचा निर्णय सांगतील. क्लार्क २७ नोव्हेंबरला अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.’‘पीसीबी’ने श्रीलंका क्रिकेट (एसएलसी) यांच्याशी संपर्क केला आणि ते मालिका आयोजित करण्यास इच्छुक आहेत. मालिका दोन स्टेडियमवर खेटरामा (आर. प्रेमदासा स्टेडियम) आणि पल्लेकल (कँडी) येथे होऊ शकते. सध्या श्रीलंकेत पाऊस जोरदार आहे; परंतु डिसेंबरच्या अखेरीस येथे हवामान चांगले राहण्याची शक्यता आहे. खेटरामा येथे काही टी-२0 सामने होणार आहेत; परंतु अधिकृत घोषणेनंतर एसएलसी त्यांचे वेळापत्रक तयार करेल.२00९च्या लाहोर हल्ल्यानंतर पाकिस्तानात खेळण्यास कसोटी खेळणाऱ्या संघांनी नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानचे स्पर्धा आयोजित करण्याचे स्थळ यूएई बनले आहे.