आशियाडमध्ये भारत-पाक एकाच गटात
By Admin | Updated: August 21, 2014 01:06 IST2014-08-21T01:06:42+5:302014-08-21T01:06:42+5:30
सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या 17 व्या आशियाड स्पर्धेच्या पुरुष हॉकी प्रकारात एकाच ‘ब’ गटात ठेवण्यात आले आहे.

आशियाडमध्ये भारत-पाक एकाच गटात
नवी दिल्ली : गत चॅम्पियन पाकिस्तान आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी भारतीय संघाला द. कोरियातील इंचियोन येथे 19 सप्टेंबरपासून सुरू होत असलेल्या 17 व्या आशियाड स्पर्धेच्या पुरुष हॉकी प्रकारात एकाच ‘ब’ गटात ठेवण्यात आले आहे.
आशियाई हॉकी महासंघाने बुधवारी पुरुष आणि महिला हॉकी स्पर्धेची गटवारी जाहीर केली. पुरुषांमध्ये भारताला ‘ब’ गटात पाक, ओमान, चीन आणि लंकेसोबत ठेवण्यात आले आहे. ‘अ’ गटात उपविजेता मलेशिया, यजमान कोरिया, जपान, बांगलादेश आणि सिंगापूरचा समावेश असेल. महिलांमध्ये ‘अ’ गटात भारतासह चीन, मलेशिया, आणि थायलंड यांना स्थान देण्यात आले असून, ‘ब’ गटात कोरिया, जपान, कझाकिस्तान आणि हाँगकाँग यांचा समावेश राहील. आशियाडमध्ये दोन्ही गटात सुवर्ण विजेत्या संघांना 2क्16 च्या रियो ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळेल. चार वर्षाआधी ग्वांगझू येथे झालेल्या आशियाडमध्ये पाकने मलेशियाचा 2-क् ने पराभव करीत सुवर्ण जिंकले होते. भारताला कांस्य पदक मिळाले होते. महिला गटात भारतीय संघ जपानकडून पराभूत झाल्याने चौथ्या स्थानावर होता. भारताने बँकॉक आशियाडमध्ये धनराज पिल्लेच्या नेतृत्वात 1998 साली सुवर्ण पदक जिंकले. त्या वेळी द. कोरियावर पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने मात केली होती. 2क्क्2 मध्ये भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले तर 2क्क्6 मध्ये सेमीफायनलही गाठता आली नव्हती. भारताने आशियाडमध्ये आतार्पयत दोन सुवर्ण, नऊ रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकली आहेत.
भारतीय महिला संघ 1982 साली आशियाडमध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. (वृत्तसंस्था)