भारताचा स्कॉटलंडवर विजय
By Admin | Updated: June 16, 2017 04:05 IST2017-06-16T04:05:53+5:302017-06-16T04:05:53+5:30
डब्लु एचएल हॉकी सेमी फायनलमध्ये भारताने स्कॉटलंडवर ४ -१ ने दणदणीत विजय मिळवला. भारताने सामन्याच्या सुरूवातीला स्कॉटलंड कडून गोल स्विकारला.

भारताचा स्कॉटलंडवर विजय
लंडन : डब्लु एचएल हॉकी सेमी फायनलमध्ये भारताने स्कॉटलंडवर ४ -१ ने दणदणीत विजय मिळवला. भारताने सामन्याच्या सुरूवातीला स्कॉटलंड कडून गोल स्विकारला. मात्र त्यानंतर भारताने सामन्यात पुनरागमन करत स्कॉटलंडला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही.
स्कॉटलंडचा कर्णधार ख्रिस ग्राससिक याने सहाव्या मिनिटाला गोल करत संघाला आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये भारताचा संघ ० -१ ने मागे राहिला. मात्र त्यानंतर भारताने चार गोल केले.
रमणदीप सिंह याने ३१ व्या आणि ३४ व्या मिनटाला सलग दोन गोल केले. तर आकाशदीप सिंह याने ४० व्या तर हरमनप्रीत सिंह याने ४२ व्या मिनिटाला गोल केला. ही आघाडी भारताने अखेरपर्यंत कायम राखत स्कॉटलंडवर मोठा विजय मिळवला.