शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 11:27 IST

Lalit Upadhyay Announces Retirement: चमकदार कारकि‍र्दीनंतर ऑलिंपिक पदक विजेता ललित कुमार उपाध्याय याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली.

भारतीय आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू ललित उपाध्याय याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा केली. ललित उपाध्यायने रविवारी (२२ जून २०२५) रात्री त्यांच्या सोशल मिडियाच्या माध्यमातून निवृत्तीची माहिती दिली. उपाध्याय यांनी टोकियो २०२० आणि पॅरिस २०२४ मध्ये दोन ऐतिहासिक ऑलिंपिक कांस्यपदके जिंकली.

निवृत्तीची घोषणा करताना ललित उपाध्याय याने एक्सवर पोस्ट केली, ज्यात त्याने म्हटले की, "आज, मी आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर करतो. हा एक कठीण क्षण आहे. परंतु, प्रत्येक खेळाडूला एके दिवशी या कठीण क्षणाचा सामना करावाच लागतो. आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आणि अभिमान होता. सर्व गोष्टींसाठी धन्यवाद"

दरम्यान २०२० च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये देशासाठी कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघात ललितने फॉरवर्ड खेळाडूची भूमिका बजावली. कांस्यपदक जिंकल्यानंतर सरकारने त्याला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित केले. ललित हा वाराणसीच्या शिवपूर गावातील भगतपूरचा रहिवासी आहे आणि त्याने शेकडो आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याला २०१७ मध्ये लक्ष्मण पुरस्कार आणि २०२१ मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. २०२० नंतर, २०२४ च्या ऑलिंपिकमध्येही ललित भारतीय हॉकी संघाचा भाग होता. या ऑलिंपिकमध्येही भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक मिळाले.

ऑलिंपिक पदक विजेता ललित उपाध्याय याने आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये आपला ठसा उमटवला. त्याची उत्तर प्रदेशात पोलीस उपअधीक्षक म्हणूनही नियुक्ती झाली. २०२० च्या ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचा भाग असलेल्या ललित  याला २०२२ मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नियुक्ती पत्र देऊन डीएसपी बनवले. याआधी त्याने ओएसडीची ऑफर नाकारली आणि दुसऱ्यांदा त्यांना पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. ज्यावेळी त्याने ओएसडी पद नाकारले, तेव्हा त्यांनी सांगितले होते की, मी बीपीसीएलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत आहे, म्हणून त्यांनी ओएसडी पद नाकारले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर डीएसपी पदाची जबाबदारी सोपवली.

टॅग्स :Hockeyहॉकी