भारताचे टार्गेट ‘टॉप फाईव्ह’

By Admin | Updated: September 19, 2014 02:17 IST2014-09-19T02:17:37+5:302014-09-19T02:17:37+5:30

दिल्ली राष्ट्रकुल, ग्वांग्झू आशियाई स्पर्धा, लंडन ऑलिम्पिक आणि ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत छाप सोडणा:या भारताकडून इंचियोनमध्ये 17 व्या आशियाई स्पर्धेत शानदार कामगिरीची आशा आहे.

India's Target 'Top Five' | भारताचे टार्गेट ‘टॉप फाईव्ह’

भारताचे टार्गेट ‘टॉप फाईव्ह’

इंचियोन : दिल्ली राष्ट्रकुल, ग्वांग्झू आशियाई स्पर्धा, लंडन ऑलिम्पिक आणि ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत छाप सोडणा:या भारताकडून इंचियोनमध्ये 17 व्या आशियाई स्पर्धेत शानदार कामगिरीची आशा आहे. 28 वर्षानंतर पदक तालिकेत अव्वल पाचमध्ये स्थान मिळविण्याचे भारताचे 
लक्ष्य आहे.
भारताने चार वर्षापूर्वी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत 38 सुवर्णपदकांसाह एकूण 1क्1 पदक पटकाविण्याचा विक्रम केला होता. त्यानंतर महिनाभराने झालेल्या ग्वांग्झू आशियाई स्पर्धेत भारताने 14 सुवर्णपदकांसाह एकूण 65 पटके पटकाविली होती. भारताची ही आशियाई स्पर्धेतील दुसरी सवरेत्तम कामगिरी ठरली होती. 2क्12 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताने 2 रौप्यपदकांसह एकूण 6 पदके पटकाविली होती. अलीकडेच संपलेल्या ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 15 सुवर्णपदकांसह एकूण 64 पदके जिंकण्याची कामगिरी केली. 
भारत 1986 मध्ये सेऊल आशियाई स्पर्धेत पदक तालिकेत पाचवे स्थान पटकाविले होते. भारताला त्यानंतर आशियाई स्पर्धेत अव्वल पाचमध्ये स्थान मिळविता आले नाही. ग्वांग्झूमध्ये भारत सहाव्या स्थानी होता तर याआधी 2क्क्6 मध्ये दोहा आशियाई स्पर्धेत भारताला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. 2क्क्2 च्या बुसान आशियाई स्पर्धेत भारत सातव्या तर 1998 च्या बँकॉक आशियाई स्पर्धेत भारत नवव्या स्थानी होता. 1994 च्या हिरोशिमा आशियाई स्पर्धेत भारताला आठवे स्थान मिळाले होते. 199क् च्या बीजिंग आशियाई स्पर्धेत भारताला अव्वल 1क् मध्ये स्थान मिळविता आले नव्हते. सेऊलनंतर दक्षिण कोरियातील इंचियोन हे शहर भारतासाठी ‘लकी’ ठरते का,  याबाबत उत्सुकता आहे. प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये गेल्या चार वर्षात भारताच्या कामगिरीचा आलेख उंचावत आहे. त्यामुळे यावेळी भारत पदक तालिकेत अव्वल पाचमध्ये स्थान मिळविणार, अशी आशा आहे. (वृत्तसंस्था)
 
जिम्नॅस्ट, प्रशिक्षकाला परत बोलावणार?
आशियाई स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी दक्षिण कोरियाला गेलेले जिम्नॅस्ट प्रशिक्षक मनोज राणा आणि जिम्नॅस्ट खेळाडू चंदन पाठक यांना महिला जिम्नॅस्टच्या शोषण प्रकरणात चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलीस मायदेशी बोलावू शकत़े याबद्दल एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले की, महिला जिम्नॅस्टच्या शोषणप्रकरणी चौकशी करण्यासाठी गरज पडल्यास जिम्नॅस्ट आणि प्रशिक्षकाला परत बोलावले जाऊ शकत़े महिला जिम्नॅस्टने दिल्ली पोलिसांत दिलेल्या तक्रारीत प्रशिक्षक आणि जिम्नॅस्ट खेळाडूंनी 2 सप्टेंबर रोजी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सराव सत्रदरम्यान कपडय़ांबद्दल अश्लील शब्दात टिप्पणी केल्याचा आरोप केला होता़
 
सरदारसिंग भारताचा ध्वजवाहक
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या शुक्रवारी होणा:या उद्घाटन समारंभासाठी भारतीय पथकाच्या ध्वजवाहकाचा मान पुरुष हॉकी संघाचा कर्णधार सरदारसिंग याला मिळाला आहे. भारतीय पथकाचे प्रमुख एडिले सुमारिवाला म्हणाले,‘ध्वजवाहक म्हणून भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार सरदारसिंग यांची निवड करण्यात आली आहे. अनेकांनी याबाबत विचारणा केली. कुठला खेळाडू उपलब्ध राहील, याबाबत प्रशिक्षकांकडून माहिती घेतली. ज्या खेळाडूंचा दुस:या दिवशी किंवा त्यानंतरच्या दिवशी इव्हेंट आहे ते खेळाडू स्टेडियमबाहेर दुपारी 12 ते 4 या वेळेत उभे राहण्यास इच्छुक नाहीत. सरदारचा सामना नाही. त्यामुळे त्याने आनंदाने ही भूमिका स्वीकारली.’ 

 

Web Title: India's Target 'Top Five'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.