ગરમ ગરમ સીરો, નીરજ ભાઈ હીરો : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा खेळला गरबा, गुजरातमध्ये त्याला पाहण्यासाठी गर्दी, Video 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 04:32 PM2022-09-29T16:32:31+5:302022-09-29T16:32:59+5:30

ऑलिम्पिक आणि डायमंड लीग विजेता गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने गुजरातच्या वडोदरा येथे नवरात्रोत्सवात सहभाग घेतला.

India's star athlete, Neeraj Chopra, joined the Garba festivities in Gujarat's Vadodara ahead of the 36th National Games, Video | ગરમ ગરમ સીરો, નીરજ ભાઈ હીરો : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा खेळला गरबा, गुजरातमध्ये त्याला पाहण्यासाठी गर्दी, Video 

ગરમ ગરમ સીરો, નીરજ ભાઈ હીરો : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा खेळला गरबा, गुजरातमध्ये त्याला पाहण्यासाठी गर्दी, Video 

googlenewsNext

ऑलिम्पिक आणि डायमंड लीग विजेता गोल्डन बॉय नीरज चोप्रा याने गुजरातच्या वडोदरा येथे नवरात्रोत्सवात सहभाग घेतला. यावेळी नीरजने गरबाही खेळला. ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी नीरज गुजरातला गेला आहे आणि नवरात्रीच्या सणाचा आनंद साजरा करण्याचा मोह त्यालाही आवरता आला नाही. त्याला पाहण्यासाठी तरुण-तरुणींची गर्दी उसळली होती. नीरज येथील गरबा महोत्सवात पारंपरिक कपडे परिधान करून पोहोचला. त्याची एन्ट्री होताच उपस्थितांनी त्याच्या नावाचा गजर केला. काही लोकांनी खास गुजराती भाषेत ગરમ ગરમ સીરો, નીરજ ભાઈ હીરો असे म्हटले. ( गरम गरम सीरो ( हलवा), नीरज भाई हीरो).  


मागील महिन्यात नीरजने लॉसने डायमंड लीग (Lausanne Diamond League) स्पर्धेत विजेतेपद जिंकले होते आणि ही स्पर्धा जिंकणारा तो  पहिला भारतीय ठरला. त्याआधी त्याने वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Atheletics Championships) रौप्य पदक मिळवून या स्पर्धेतील भारताचा १९ वर्षांचा दुष्काळ संपवला. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला तब्बल १९ वर्षांपूर्वी २००३ मध्ये पहिले पदक मिळाले होते. २००३ मध्ये भारताची स्टार अॅथलीट अंजू बॉबी जॉर्जने पहिले पदक जिंकले होते, तिने महिलांच्या लांब उडीत कास्यंपदक पटकावले होते. 

नीरजची 'सुवर्ण' कामगिरी 

  • जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा - सुवर्णपदक
  • आशियाई स्पर्धा २०१८ - सुवर्णपदक 
  • राष्ट्रकुल स्पर्धा - सुवर्णपदक
  • टोकियो ऑलिम्पिक २०२० - सुवर्णपदक
  • जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धा २०२२ - रौप्यपदक 



Web Title: India's star athlete, Neeraj Chopra, joined the Garba festivities in Gujarat's Vadodara ahead of the 36th National Games, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.