भारताची संथ सुरुवात, 27 षटकात 1 बाद 72 धावा

By Admin | Updated: July 21, 2016 21:52 IST2016-07-21T21:07:21+5:302016-07-21T21:52:12+5:30

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने यजमान वेस्ट इंडिजविरुध्द सावध सुरुवात करताना चहापाण्यापर्यंत 27 षटकात 1 बाद 72 धावा केल्या.

India's slow start, 72 runs away from 1 in 27 overs | भारताची संथ सुरुवात, 27 षटकात 1 बाद 72 धावा

भारताची संथ सुरुवात, 27 षटकात 1 बाद 72 धावा

विंडिज कसोटी : मुरली विजय झटपट बाद

अ‍ॅण्टीग्वा : चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने यजमान वेस्ट इंडिजविरुध्द सावध सुरुवात करताना चहापाण्यापर्यंत 27 षटकात 1 बाद 72 धावा केल्या. सलामीवीर मुरली विजय याच्यारुपाने भारताला पहिला धक्का बसला.
येथील सर विवियन रिचर्डस स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुरली विजय आणि शिखर धवन यांनी सावध भूमिका घेताना विंडिज गोलंदाजीचा आणि खेळपट्टीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. शॅनॉन गॅब्रीयल, कर्णधार जेसन होल्डर आणि कार्लोस ब्रेथवेट यांनी अचूक मारा करताना भारतीय फलंदाजांना जखडवण्यात यश मिळवले.

मात्र, गॅब्रीयल टाकत असलेल्या सातव्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर मुरली विजय ब्रेथवेटच्या हाती झेल देऊन परतला. विजय 26 चेंडूत एका चौकारासह केवळ 7 धावा काढून परतला. तर, धवनच्या सोबतीला आलेल्या चेतेश्वर पुजाराने दमदार बचाव करताना विंडिज गोलंदाजांना डोके वर काढण्याची संधी दिली नाही. शिखर धवन 74 चेंडूत चार चौकारासह 46 धावांवर खेळत असून पुजारा 63  चेंडूत 14 धावांवर खेळत आहे.

Web Title: India's slow start, 72 runs away from 1 in 27 overs