India's leadership axes towards Nita Mehta; Tricolor tricolor in Kazakhstan | नीता मेहताकडे भारताच्या नेतृत्त्वाची धुरा; कझाकिस्तान येथे फडकाविला तिरंगा
नीता मेहताकडे भारताच्या नेतृत्त्वाची धुरा; कझाकिस्तान येथे फडकाविला तिरंगा

धनकवडी : नीता मेहता यांनी कझाकिस्तान येथे झालेल्या आशियाई क्रीडा महिला पॉवरलिफ्टींग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. यासह नीताने २०२० मध्ये होणाऱ्या विश्व स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा मान मिळविला आहे.

खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना चिकाटी, दृढनिश्चय व सातत्याने केलेल्या कठोर सरावाच्या जोरावर निता यांनी मिळविलेल्या
या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नीता पुण्यातील सारसबाग परिसरात राहात असून, सातारा रस्ता परिसरातील नामांकित संस्थेत प्रशिक्षण घेत आहेत.

एक गृहिणी ते राष्ट्रीय अजिंक्यपद आणि २०२० च्या विश्वस्तरीय स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व हा प्रवास सर्वसामान्य गृहिणींना निश्चितच प्रेरणादायी आणि प्रोत्साहन देणारा ठरेल. नीताने वयाच्या तिशीनंतर उत्तम आरोग्यासाठी दृढनिश्चय करून व्यायामाला सुरुवात केली. कौटुंबिक जबाबदाºया पार पाडत असताना निरोगी आरोग्यासाठी फावल्या वेळात नीताने व्यायाम करण्यास सुरुवात केली. मात्र अगदी कमी कालावधीमध्येच नीतामधील गुणवत्ता आणि कौशल्य प्रशिक्षक ओंकार नेलेकर यांनी हेरले आणि निताला त्यांनी खेळामध्ये कारकिर्द करण्याचा सल्ला दिला.

‘आनंद शब्दात व्यक्त करणे कठीण’

गुरु आज्ञेनुसार नीताने लगेच सरावाला सुरुवात केली आणि प्रशिक्षक नेलेकर यांनी नीताला पॉवरलिफ्टींग सारख्या खेळामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. योग्य आहार, व्यायामाचे नियोजन, सातत्य आणि कठोर मेहनत करीत नीताने पॉवरलिफिटंगमध्ये चॅम्पियन बनण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पुर्ण केले. ‘हा आनंद शब्दात व्यक्त करण्यासारखा नाही,’ अशी प्रतिक्रिया नीताने दिली. जिल्हास्तरीय, राज्य, राष्ट्रीय आणि आशियाई क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाºया नीताने यानंतर पुन्हा मागे वळून पाहिले नाही.
आपल्या गटात स्काटमध्ये शंभर किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले, बेंचप्रेस मध्ये ४७.५ किलो वजन उचलत रौप्य पदक मिळविले, तर डेटलेफ्टमध्ये ११५ किलो वजन उचलून नीताने सुवर्णपदकावर नाव कोरले.

 

Web Title: India's leadership axes towards Nita Mehta; Tricolor tricolor in Kazakhstan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.