पहिला दिवस भारताचा
By Admin | Updated: June 27, 2014 01:32 IST2014-06-27T01:32:13+5:302014-06-27T01:32:13+5:30
लिस्टरशर विरुद्धच्या सराव सामन्यात पहिल्या दिवसअखेर 4 बाद 333 धावांर्पयत मजल मारली़

पहिला दिवस भारताचा
>लिस्टर : शिखर धवन (6क्), चेतेश्वर पुजारा (57), गौतम गंभीर (54) यांच्या शानदार अर्धशतकी खेळाच्या बळावर भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सकारात्मक सुरुवात करताना लिस्टरशर विरुद्धच्या सराव सामन्यात पहिल्या दिवसअखेर 4 बाद 333 धावांर्पयत मजल मारली़
भारताकडून धवन, पुजारा, गंभीर यांनी झळकावलेल्या आकर्षक अर्धशतकानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजिंक्य रहाणो 47, तर रोहित शर्मा 43 धावांवर खेळत होता़ या जोडीने पाचव्या गडय़ासाठी 74 धावांची भागीदारी रचली होती़ इंग्लंडविरुद्ध सुरू होणा:या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांचे यश चांगली सुरुवात मानले जात आह़े
धवन याने 1क्क् चेंडूंचा सामना करताना 6क् धावांची खेळी केली़ मात्र तो वेगवान गोलंदाज अतीफ शेखच्या शॉर्टपीच चेंडूवर दुखापतग्रस्त होऊन रिटायर्ड हर्ट झाला़ त्याने आपल्या खेळीत 12 खणखणीत चौकार लगावल़े त्याआधी मुरली विजय 2क् धावा काढून बाद झाला़
गंभीरने आपल्या खेळीत 1क्1 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार लगावले, तर पुजारा याने 98 चेंडूंना सामोरे जाताना 8 चौकार लगावल़े भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला मात्र मोठी खेळी करता आली नाही़ तो 49 चेंडूंत 29 धावा काढून बाद झाला़ लिस्टरशर कडून अँथोनी आर्यलड आणि शिव ठाकूर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला़