सिडनी : वर्ल्डकपमध्ये भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करून प्रतिस्पर्धी संघांची दाणादाण उडविली आहे़ भारतीय संघाचा हा आतापर्यंतचा सर्वात प्रभावी मारा आहे, असे मत आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने व्यक्त केले आहे़ वर्ल्डकपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मोहंमद शमीचेही लीने विशेष कौतुक केले़ली पुढे म्हणाला, ‘‘भारताचे वेगवान गोलंदाज मोहंमद शमी, उमेश यादव आणि मोहित शर्मा यांनी ७० पैकी ४२ विकेट्स मिळविल्या आहेत़ यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे़ या गोलंदाजांनी योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली, तर आॅस्ट्रेलिया अडचणीत येऊ शकतो़’’ मोहंमद शमीविषयी ली म्हणाला, की इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) मध्ये कोलकाता नाईटचे प्रतिनिधित्व केले होते, तेव्हा मोहंमद शमीची गोलंदाजी जवळून बघता आली़ हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीवर विशेष मेहनत घेतो़ वर्ल्डकपमध्ये त्याला या मेहनतीचे फळ मिळाले़
भारताचा वेगवान मारा प्रभावी : ली
By admin | Updated: March 25, 2015 01:16 IST