भारताचे स्वप्न भंगले
By Admin | Updated: December 14, 2014 02:21 IST2014-12-14T02:21:25+5:302014-12-14T02:21:25+5:30
रोमहर्षकतेच्या शिखरावर पोहोचलेली लढत जिंकण्यात यजमान भारताला अपयश येताच आपल्याच देशात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले.

भारताचे स्वप्न भंगले
चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी : पाकिस्तान 4-3 गोल विजयासह अंतिम फेरीत
भुवनेश्वर : कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत- पाकिस्तान यांच्यातील रोमहर्षकतेच्या शिखरावर पोहोचलेली लढत जिंकण्यात यजमान भारताला अपयश येताच आपल्याच देशात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले.
शनिवारी खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात पाककडून भारताचा 4-3 ने पराभव झाला. तीनवेळेचा चॅम्पियन पाकने 59 व्या नोंदविलेला चौथा गोल निर्णायक ठरताच पहिल्यांदा अंतिम फेरी गाठण्याच्या भारताच्या आशा देखील संपुष्टात आल्या. उद्या रविवारी अंतिम सामन्यात पाकिस्तानपुढे आव्हान असेल ते जर्मनीचे. प्रेक्षकांनी खच्चून भरलेल्या कलिंगा स्टेडियममध्ये उपस्थित भारतीय चाहत्यांची अखेरच्या काही मिनिटांत झालेल्या गोलमुळे पराभवाचा फटका बसल्याने घोर निराशा झाली.
भारत 2क्12 मध्ये पाककडून तिस:या स्थानासाठी झालेल्या लढतीत पराभूत झाला होता. त्यापूर्वी 2क्क्2, 2क्क्3 आणि 2क्क्4 मध्येही तिस:या स्थानासाठींच्या लढतीत पाकने भारताला नमविले होते. भारताने इंचियोन आशियाडच्या अंतिम सामन्यात पाकचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करीत सुवर्ण जिंकले आणि रियो ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले होते. पण आज पाकने भारताला त्यांच्यात चाहत्यांपुढे पराभवाची धूळ चारली. दुसरीकडे पाकने 1998 नंतर 16 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत
धडक दिली.
अतिशय जलद गतीने खेळल्या गेलेल्या या लढतीत पाककडून मोहम्मद अर्सलान कादिर याने चौथा गोल केला. दोन गोल नोंदविणा:या कादिरचा सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. सामन्यात भारताने आघाडी मिळविली होती. 12 व्या मिनिटाला गुरजिंदरने हा गोल केला होता. पण कादिरने 18व्या मिनिटाला पाकला बरोबरी साधून दिली. मोहम्मद वकास याने तिस:या मिनिटाला आणखी एक गोल नोंदवित पाकला आघाडी मिळवून दिली. धर्मवीरने 38व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल करीत सामना 2-2 असा बरोबरीत आणला होता. पाकला 44व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर मोहम्मद इरफानने गोल नोंदवित पाककडे आघाडी होती पण याच मिनिटाला तिमय्याने भारताकडून गोल करीत पुन्हा 3-3 ने बरोबरीत आणले. सामना संपायला दोन मिनिटांचा अवधी होता. त्याच वेळी कादिरने 59व्या मिनिटाला गोल नोंदवित मैदानात स्मशान शांतता पसरली. सामना गमविल्याचे शल्य मनात घेत भारतीय खेळाडूंनी खाली मान घालूनच स्टेडियम सोडले. भारताला उद्या रविवारी कांस्यपदकासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढत द्यावी लागेल. (वृत्तसंस्था)
पाकिस्तान-जर्मनी अंतिम लढत
पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनी संघाने विश्व चॅम्पियन ऑस्ट्रेलिया संघाचा 3-2 गोलने पराभव करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. जर्मनीकडून त्रिमूरने 5 व्या, ग्रामूशने 9व्या व फ्लोरियनने 31व्या मिनिटाला गोल केले.