हीनानं केली भारताची निराशा

By Admin | Updated: August 7, 2016 19:06 IST2016-08-07T19:06:04+5:302016-08-07T19:06:04+5:30

मुंबईच्या हीना सिद्धूची विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेच्या दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेतील अंतिम फेरी चार गुणांनी हुकली.

India's disappointment with low inflation | हीनानं केली भारताची निराशा

हीनानं केली भारताची निराशा

ऑनलाइन लोकमत

रिओ दि जनरियो, दि. 7- मुंबईच्या हीना सिद्धूची विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेच्या दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेतील अंतिम फेरी चार गुणांनी हुकली. हीना फायनलसाठी क्वालिफायर झाली नाही. सलग तिस-या दिवशी भारतीय पदकाची पाटी कोरी राहिली आहे. अपूर्वी चंडेला आणि अयोनिका पॉल 10 मीटर एअर रायफल अनुक्रमे 34 आणि 43व्या आले आहेत. जीतू राय आणि गुरप्रीम सिंह यांच्यासारखीच हीनानं निराशा केली आहे. हीना 380 गुणांच्या कमाईसह 14व्या स्थानावर फेकली गेली आहे. ती पहिल्या 8 मध्येही जागा मिळवू शकली नाही. या स्पर्धेत हीना भारताकडून एकमात्र शूटर होती. फायनलमध्ये क्वालिफायर होण्यासाठी तिला पहिल्या आठमध्ये येणं गरजेचं होतं.

Web Title: India's disappointment with low inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.