भारताचे बांगलादेशला १४७ धावांचे आव्हान
By Admin | Updated: March 23, 2016 21:27 IST2016-03-23T21:19:37+5:302016-03-23T21:27:37+5:30
टी-२० वर्ल्डकपमध्ये बांगलादेश विरुद्धच्या आजच्या सामन्यात मोठा विजय मिळवून नेट रनरेटमध्ये पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्नात असलेल्या भारताने बांगलादेशला २० षटकात १४७ धावांचे आव्हान दिले

भारताचे बांगलादेशला १४७ धावांचे आव्हान
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. २३ - टी-२० वर्ल्डकपमध्ये बांगलादेश विरुद्धच्या आजच्या सामन्यात मोठा विजय मिळवून नेट रनरेटमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्नात असलेल्या भारताने बांगलादेशला २० षटकात १४७ धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात भारताने सात बाद १४६ धावा केल्या.
फलंदाज रोहित शर्मा १८ धावा काढून बाद झाल्यानंतर भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर लगेचच शिखर धवन तंबूत परतल्याने पाठोपाठ दुसरा धक्का बसला. शिखर धवनने २३ धावा काढल्या. तर, आक्रमक फलंदाज विराट कोहलीही जास्त वेळ मैदानात टिकू शकला नाही. त्याला २४ धावांवर बांगलादेशचा गोलंदाज शुवागता होमने यष्टीचीत केले.
या सामन्यात सुरेश रैनाने सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावत ३० धावा केल्या. सुरेश रैना झेलबाद झाल्यानंतर लगेचच हार्दिक पांड्याही १२ धावांवर झेलबाद झाला. हार्दिक पांड्यांचा झेल सौम्या सरकारने घेतला. तर युवराज सिंग अवघ्या ३ धावा काढून तंबूत परतला. रविंद्र जडेजा १२ धावांवर बाद झाला. महेंद्रसिंग धोनीने नाबाद १३ धावा केल्या, तर आर. आश्विनने पाच धावा केवल्या.
बांगलादेशकडून गोलंदाज अल अमीन हुसेन आणि मुस्तफिजुर रहमानने यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले, तर शुवागता होम, महमदुल्ला आणि शाकीबुल हसन यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतले.