भारताच्या सर्वबाद ३७५ धावा, लंकेवर १८७ धावांची आघाडी

By Admin | Updated: August 13, 2015 17:51 IST2015-08-13T17:25:39+5:302015-08-13T17:51:10+5:30

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताने फलंदाज शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीच्या यांच्या शानदार शतकी खेऴीच्या जोरावर सर्वबाद ३७५ धावा करत श्रीलंकेवर १८७ धावांची

India's 375 all out, 187 runs at Lanka | भारताच्या सर्वबाद ३७५ धावा, लंकेवर १८७ धावांची आघाडी

भारताच्या सर्वबाद ३७५ धावा, लंकेवर १८७ धावांची आघाडी

ऑनलाइन लोकमत
गाले, दि. १३ - श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात फलंदाज शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीच्या यांच्या  शानदार शतकी खेऴीच्या जोरावर भारताने  सर्वबाद ३७५ धावा केल्या असून श्रीलंकेवर १८७ धावांची आघाडी मिऴवली आहे. 
दुस-या दिवशी भारताने सर्व गडी बाद ३७५ धावा केल्या. तर पहिल्या डावात १८३ धावा करणा-या श्रीलंकेची फलंदाजी दुस-या दिवशीच्या डावातही डगमगळीत झाली.  श्रीलंकेने दिवसाअखेरीस दुस-या डावात ५ धावांमध्ये २ गडी गमावले आहेत.
भारताचा भरवशाचा फलंदाज शिखर धवनने १३ चौकार लगावत १३४ धावा केल्या, तर त्याला  कर्णधार विराट मोलाची साथ देत ११ चौकारांसह १०३ धावा केल्या. सुरुवातीला लोकेश राहुल अवघ्या ७ धावांवर पायचित झाला. त्यांतर रोहित शर्मा (९) अजिंक्य रहाणे (०), शहा (६०), आर. अश्विन (७),  हरभजन सिंग (१४), अमित मिश्रा (१०), वरुण अरोन चार धावा काढून बाद झाला, तर इशांत शर्माने नाबाद तीन धावा काढल्या. 
श्रीलंकेकडून गोलंदाज थारिंडु कौशलने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या, तर एन प्रदीपने तीन आणि धम्मिका प्रसाद व अँजेलो मॅथ्यूज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला. 
गोलंदाज आर. आश्विनची गोलंदाजीत सर्वोत्कृष्ट कामगिरीपाठोपाठ (४६ धावांत ६ बळी) शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या नाबाद शतकी खेळीमुळे भारताने बुधवारपासून सुरू झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी लंकेला १८३ धावांत गारद केले होते. 
 

 

Web Title: India's 375 all out, 187 runs at Lanka