दिवसाखेर भारत ५ बाद ३४२, कोहलीची शानदार खेळी
By Admin | Updated: January 8, 2015 12:43 IST2015-01-08T09:46:20+5:302015-01-08T12:43:24+5:30
कर्णधार विराट कोहलीची शानदार नाबाद १४० धावांची खेळी आणि लोकेश राहुल याचे शतक (११०) याच्या जोरावर तिस-या दिवसाखेर भारताने ५ गडी गमावत ३४२ धावा केल्या आहेत.

दिवसाखेर भारत ५ बाद ३४२, कोहलीची शानदार खेळी
ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. ८ - कर्णधार विराट कोहलीची शानदार नाबाद १४० धावांची खेळी आणि लोकेश राहुल याचे शतक (११०) याच्या जोरावर तिस-या दिवसाखेर भारताने ५ गडी गमावत ३४२ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने (नाबाद १११) कर्णधारपदाला साजेसा खेळ करत आणखी एक शतक फटकावले असून या मालिकेतील त्याचे चौथे शतक आहे.
तत्पूर्वी लोकेश राहुलने कसोटीतील पहिले शतक फटकावत रोहित शर्माच्या साथीने (५३) भारताचा डाव सावरला. शर्मा बाद झाल्यानंतरही त्याने कर्णधार विराट कोहलीला (नाबाद १०१)चांगली साथ दिली. तो बाद (११०) झाल्यावर विराट कोहलीने कर्णधार पदाला साजेशी खेळी करत शतक तर फटकावलेच पण भारताला चांगली धावसंख्या उभारायला मदत केली. मधल्या फळीतील फलंदाज रहाणे (१३) व रैना (०) पटापट बाद झाल्याने भारताला धक्का बसला. दिवसाअखेर कोहली व सहा (१४) खेळत आहेत. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्कने व वॉटसनने २ तर लियॉनने १ बळी टिपला.