शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

आंदोलक पैलवानांनी निम्मी कुस्ती जिंकली; ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध FIR दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 15:46 IST

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत.

brijbhushan singh news । नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात होत असलेल्या आंदोलनाला आता विविध क्षेत्रातील दिग्गज पाठिंबा देत आहेत. टेनिसपटू सानिया मिर्झासह क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राने नाराजी व्यक्त केली आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध एफआयर दाखल करण्याची मागणी घेऊन पैलवानांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या मागणीला यश आले असून भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल होणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी SC ला सांगितले की WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे

दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाला एफआयआरबद्दल माहिती दिली. खरं तर सर्वोच्च न्यायालय ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱ्या महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत होते. २६ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्टाला सांगितले होते की, आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यापूर्वी आरोपांची प्राथमिक चौकशी करणे आवश्यक आहे. FIR दाखल होणार यापूर्वी २५ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने सात महिला कुस्तीपटूंच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली होती. या महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. मंगळवारी न्यायालयाने सांगितले होते की, कुस्तीपटूंनी याचिकेत लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत, या प्रकरणात सुनावणी आवश्यक आहे.

आखाड्याबाहेरील कुस्तीचा सहावा दिवसऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी रविवारी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज आंदोलनाचा सहावा दिवस असून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत.  प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी (ब्रिजभूषण शरण सिंह) अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीWrestlingकुस्तीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयVinesh Phogatविनेश फोगटBJPभाजपा