शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 18:58 IST

क्रिकेटच्या मैदानातील ऐतिहासिक कामगिरीनंतर आता कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी ठरल्या आहेत.      

Indian Women's Team Defeated Chinese Taipei In Women’s Kabaddi World Cup 2025 Final : महिला कबड्डी विश्व चषक स्पर्धेत भारताच्या लेकींनी इतिहास रचला आहे.  १३ वर्षांनी आयोजित करण्यात आलेल्या महिला कबड्डी स्पर्धेतील दुसऱ्या हंगामात भारतीय महिला कबड्डी संघाने फायनल लढतीत चायनीज तैपेई (Chinese Taipei) संघाला ३५-२८ अशा फरकाने पराभूत केले. पहिल्या हंगामातील आपला दबदबा कायम राखत भारतीय महिला संघाने जेतेपदाचा यशस्वी बचाव करून दाखवला आहे.  क्रिकेटच्या मैदानातील ऐतिहासिक कामगिरीनंतर आता कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी ठरल्या आहेत.      

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

यंदाच्या हंगामात अपराजित राहून सलग दुसऱ्यांदा जिंकली कब्बडी वर्ल्ड कप स्पर्धा

बांगलादेश येथील ढाका येथे पार पडलेल्या महिला कब्बडी विश्वचषक स्पर्धेतील साखळी फेरीत भारतीय संघाने साखळी फेरीतील सर्वच्या सर्व चार लढती जिंकल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये तगड्या इराणच्या संघाला पराभूत करून फायनलचं तिकीट मिळवले होते. दुसरीकडे चायनीज तैपेई संघाने यजमान बांगलादेश संघाला पराभूत करत फायनल गाठली होती. 

कबड्डी जगतात भारताच्या लेकींचा दबदबा

सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकत भारताच्या लेकींनी कबड्डी जगतात आपला दबदबा पुन्हा सिद्ध केला आहे. कर्णधार रितु नेगी आणि उपकर्णधार पुष्पा राणा यांच्या अनुभवी नेतृत्वात संघाने अप्रतिम खेळ करून दाखवला. चंपा ठाकूर, भावना ठाकूर आणि साक्षी शर्मा या तिघींनीही संपूर्ण स्पर्धेत चढाई आणि बचाव या दोन्ही विभागांत उत्कृष्ट कामगिरी करत संघाची ताकद अधिक भक्कम केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : India's Daughters Reign Supreme: Women's Kabaddi World Cup Champions Again!

Web Summary : Indian women's kabaddi team clinched their second consecutive World Cup title, defeating Chinese Taipei 35-28 in the final. The team dominated the tournament, remaining undefeated and showcasing their strength in both offense and defense. India continues to dominate women's kabaddi on the world stage.
टॅग्स :Kabaddiकबड्डीIndiaभारत