शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेणार की पुढे ढकलणार? आज फैसला, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
2
आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!
3
अयोध्या नगरीत श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज, वास्तूचे काम पूर्ण झाल्याचे प्रतीक; ध्वजावर तेजस्वी सूर्य, ॐ ही प्रतीकेही, अयोध्येत कडक सुरक्षा
4
‘अनामिक’ रोख देणग्यांबद्दल कोर्टाची भाजप, काँग्रेस आणि सरकारला नोटीस!
5
सिम इतरांना द्याल तर तुरुंगात जाल, दूरसंचार विभागाचा इशारा
6
पती, सासरच्या जाचापायी राज्यात २,३७३ महिलांनी संपविले जीवन, २०२३ मध्ये देशभरात २४ हजार जणींनी उचललं टोकाचं पाऊल
7
कुणावरही टीकाटिप्पणी नाही, केवळ विकासाचे मुद्दे, मुख्यमंत्री प्रचारात फडणवीसांचा व्हिजनवर भर, विरोधकांवरही टीका नाही
8
चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक
9
१५ वर्षांत कोणती वस्तू किती महागली? खिसा कसा रिकामा?
10
भारतीय वंशाचे उद्योगपती मित्तल सोडणार ब्रिटन, समोर येतंय असं कारण
11
कर्ज हवे? चिंता करू नका; तुमचे भविष्य सुरक्षित, तर बॅंका निश्चिंत
12
कंपन्यांच्या पगार खर्चात १०% वाढ होणार, नव्या कायद्यामुळे भार; अनेक जबाबदाऱ्याही पडणार
13
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? शांतता योजनेचा मसुदा तयार; पण युक्रेनसमोर मोठे दुहेरी संकट!
14
भारताशेजारील देशांमध्ये भूकंपांची मालिका सुरूच, आता या देशात भूकंपाचे धक्के; किती होती तीव्रता?
15
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
16
नागपुरातील पत्रकार परिषदेत भडकले होते 'ही मॅन' धर्मेंद्र; कंधार विमानाचे अपहरण अन् पाजीचा सच्चेपणा...
17
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
18
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
19
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
20
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
Daily Top 2Weekly Top 5

चायनीज तैपईला नमवून भारताच्या महिला कबड्डीपटूंनी पटकावला विश्वचषक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 05:42 IST

Kabaddi News:नियोजनबद्ध आणि सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना भारतीय महिला संघाने अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सोमवारी चायनीज तैपईला ३५-२८ असे नमवले आणि दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषक पटकावला. महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धेचे हे दुसरे सत्र होते आणि दोन्ही वेळी भारतानेच विश्वचषकावर मोहोर उमटवली.

ढाका - नियोजनबद्ध आणि सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना भारतीय महिला संघाने अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सोमवारी चायनीज तैपईला ३५-२८ असे नमवले आणि दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषक पटकावला. महिला विश्वचषक कबड्डी स्पर्धेचे हे दुसरे सत्र होते आणि दोन्ही वेळी भारतानेच विश्वचषकावर मोहोर उमटवली.

अंतिम सामन्यात सुरुवातीपासूनच भारताने आक्रमक खेळ केला. मध्यंतराला २०-१६ अशी आघाडी घेत वर्चस्व राखल्यानंतर भारताने दुसऱ्या सत्रात आक्रमक खेळ करत चायनीज तैपईला पुनरागमनाची संधी दिली नाही. चढाई आणि पकडीमध्ये शानदार कौशल्य दाखवत भारतीयांनी चायनीज तैपईचे मानसिक खच्चीकरण केले. संजू देवी आणि उपकर्णधार पुष्पा यांच्या आक्रमक चढाया भारतासाठी निर्णायक ठरल्या. एकवेळ चायनीज तैपईने लोण चुकवताना १२-९ अशी आघाडी मिळवली. परंतु, संजूच्या एका दमदार चढाईच्या जोरावर भारताने बरोबरी साधली आणि यानंतर मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखली. 

१३ वर्षांनी आयोजनमहिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन तब्बल १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर करण्यात आले. याआधी, पाटणा येथे २०१२ साली पहिली महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धा रंगली होती. त्यावेळी भारताने अंतिम सामन्यात इराणला २५-१९ असे नमवून पहिले विश्वविजेतेपद पटकावले होते. पुरुष कबड्डी विश्वचषक स्पर्धा २००४, २००७ आणि २०१६ अशी तीनवेळा आयोजित झाली असून, तिन्ही वेळा भारतानेच बाजी मारताना अंतिम सामन्यात इराणला पराभूत केले. अ गटात अव्वल स्थान पटकावत भारतीय महिलांनी बांगलादेश, थायलंड, युगांडा आणि जर्मनी यांना नमवले. यानंतर उपांत्य फेरीत इराणचे तगडे आव्हान ३३-२१ असे परतवून लावत दिमाखात अंतिम फेरी गाठली होती. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : India Women's Kabaddi Team Clinches World Cup, Defeats Chinese Taipei

Web Summary : India's women's kabaddi team secured their second World Cup title, defeating Chinese Taipei 35-28 in a thrilling final. Sanju Devi and Pushpa's raiding skills proved crucial. India dominated after an initial Taipei lead, maintaining control to win the coveted championship after 13 years.
टॅग्स :Kabaddiकबड्डीIndiaभारत