Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 15:02 IST2025-11-01T14:58:03+5:302025-11-01T15:02:56+5:30
Rohan Bopanna announces retirement: भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णा यांनी निवृत्तीची घोषणा केली.

Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
भारताचा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपण्णा यांनी अखेर टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. २० वर्षांहून अधिक काळ भारतीय टेनिसला गौरवशाली कारकीर्द देणाऱ्या बोपण्णा यांच्या अचानक निवृत्तीच्या निर्णयाने त्यांचे चाहते थोडे निराश आणि आश्चर्यचकित झाले आहेत. रोहन बोपण्णा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्ती घोषणा केली.
❤️❤️❤️ pic.twitter.com/IS3scPrwhW
— Rohan Bopanna (@rohanbopanna) November 1, 2025
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या भावनिक नोटमध्ये रोहन बोपण्णा यांनी लिहिले की, "ज्या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्याला अर्थ लाभला, अशा गोष्टीला तुम्ही निरोप कसा देऊ शकतात? टेनिसच्या २० संस्मरणीय वर्षांनंतर आता अधिकृतपणे माझे रॅकेट बंद करण्याची वेळ आली आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे."
रोहन बोपण्णा यांनी टेनिसमध्ये २० वर्षांमध्ये मिळवलेली उपलब्धी, संघर्ष आणि विजय भारतीय टेनिस प्रेमींच्या हृदयात कायम राहतील. त्यांच्या करिअरमध्ये भारतीय टेनिसला जागतिक पातळीवर एक मान मिळवून दिला आणि त्याने डबल्स आणि मिश्र दुहेरीत अनेक मोठे विक्रम केले.
२०२४ मध्ये, रोहन बोपण्णा हे सर्वात वयस्कर ग्रँड स्लॅम विजेता ठरले. बोपण्णा हे दुहेरीत सर्वात वयस्कर जागतिक नंबर १ खेळाडू बनून इतिहास रचणारे खेळाडू ठरले. चार वेळा ऑलिंपियन राहिलेल्या बोपण्णा यांनी २०१६ च्या रिओ ऑलिंपिकमध्ये सानिया मिर्झासह पदकाच्या जवळ पोहोचले होते, मात्र ते थोडक्यात हुकले. २० वर्षांहून अधिक काळ ते भारतीय डेव्हिस कप संघाचा आधारस्तंभ राहिले, त्यांनी कोर्टवर आणि कोर्टबाहेर सातत्य आणि नेतृत्वगुण दाखवले. रोहन बोपण्णाच्या या निवृत्ती निर्णयामुळे टेनिस विश्वात एक मोठा बदल घडत आहे, परंतु त्याच्या यशस्वी प्रवासाचा आदर्श अनेक आगामी खेळाडूंना प्रेरणा देत राहील.