भारतीय स्केटर्सना सहा सुवर्ण
By Admin | Updated: October 4, 2014 22:54 IST2014-10-04T22:54:22+5:302014-10-04T22:54:22+5:30

भारतीय स्केटर्सना सहा सुवर्ण
>चंदीगढ: भारताने चीनमध्ये झालेल्या 16 व्या आशियाई रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये सुरेख कामगिरी करताना सहा सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्य अशा एकूण 15 पदकांची कमाई केली आहे, अशी माहिती भारतीय रोलर स्केटिंग संघाचे अध्यक्ष अरुण वालिया यांनी दिली़ भारताच्या मधू भविता भवनने मुलींच्या फिगर स्केटिंग कॅडेट गटामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली़ पारिख मिर्शी उत्कर्षने ज्युनिअर गटात तर अनुप यामाने वरिष्ठ गटात सुवर्णपदक पटकावल़े