शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींची 'जनता कर्फ्यू'ची साद; विराट, शास्त्री, भज्जी, साक्षीने 'असा' दिला प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 09:28 IST

कोरोना विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असा संदेश भारतीय खेळाडूंनी सोशल मीडियावरुन देशवासीयांना दिला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोरोना विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याचे आवाहन केल्यानंतर भारतीय खेळाडूंनीही या निर्णयास पाठिंबा दिला. कोरोना विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असा संदेश भारतीय खेळाडूंनी सोशल मीडियावरुन देशवासीयांना दिला.याविषयी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने ट्वीट केले की, ‘कोरोनाच्या धोक्यापासून वाचण्यासाठी सतर्क रहा, जागरुक रहा. जाबबादार नागरिक म्हणून आपण सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याची आवश्यकता आहे.’

फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने म्हटले की, ‘मान्य करा किंवा नको, पण एक अरब लोकसंख्येच्या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे ऐकण्याची गरज आहे.’

याशिवाय हरभजन सिंग, कुस्तीपटू योगेश्वर दत्त, विनेश फोगाट, साक्षी मलिक, हॉकीपटू राणी रामपाल यांनीही जनता कर्फ्यूला समर्थन दिले.

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले की, ‘चला, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपण २२ मार्चला सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू लावू. एक देश म्हणून आपल्याला संयम दाखविण्याची गरज आहे.’ त्याचप्रमाणे, सलामीवीर शिखर धवनने सांगितले की, ‘आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. तुम्ही सर्वजण सुरक्षित रहा आणि काळजी घ्या.’

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी