भारताच्या पंकज अडवाणीची ऐतिहासिक कामगिरी; २६व्यांदा जिंकले बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे विजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 10:58 AM2023-11-23T10:58:47+5:302023-11-23T11:06:02+5:30

अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी खेळाडूला १०००-४१६ असे हरवले

Indian player Pankaj Advani wins world billiards championship for 26th time historic win | भारताच्या पंकज अडवाणीची ऐतिहासिक कामगिरी; २६व्यांदा जिंकले बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे विजेतेपद

भारताच्या पंकज अडवाणीची ऐतिहासिक कामगिरी; २६व्यांदा जिंकले बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचे विजेतेपद

World Billiards Championship 2023: स्नूकर आणि बिलियर्ड्स या खेळात भारताचे नाव उंचावणारा भारताचा स्टार क्यू खेळाडू पंकज अडवाणीने पुन्हा एक नव्या पराक्रमाला गवसणी घातली. IBSF (वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप) च्या अंतिम फेरीत त्याने इतिहास रचला. पंकज अडवाणीने अंतिम फेरीत 2018 चा विश्वविजेता सौरव कोठारीचा 1000-416 असा पराभव करून 26व्यांदा विजेतेपद पटकावले.

पंकज अडवाणीने 2005 मध्ये पहिले जगज्जेतेपद पटकावले होते. अडवाणीने 'लाँग फॉरमॅट'मध्ये नऊ वेळा विजेतेपद पटकावले आहे, तर 'पॉइंट्स फॉरमॅट'मध्ये तो आठ वेळा चॅम्पियन ठरला आहे. याशिवाय एकदा वर्ल्ड टीम बिलियर्ड्स चॅम्पियनशिप जिंकण्यातही तो यशस्वी ठरला होता.

या स्पर्धेत याआधी पंकज अडवाणीनेही सेमीफायनल मॅचमध्ये शानदार कामगिरी केली होती. जागतिक बिलियर्ड्स आणि स्नूकरचा 26 वेळचा चॅम्पियन असलेल्या पंकजने उपांत्य फेरीत रुपेश शाहचा पराभव केला होता. यासह त्याने अंतिम फेरीत धडक मारली होती. पंकजने रुपेशचा ९००-२७३ असा पराभव केला. तर फायनलिस्ट कोठारीने उपांत्य फेरीत ध्रुव सितवालाचा ९००-७५६ असा पराभव केला होता.

Web Title: Indian player Pankaj Advani wins world billiards championship for 26th time historic win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.