Tokyo Olympic : ती पदकाचं स्वप्न घेऊन गेली होती, पण भारतात बहिणीनं घेतला अखेरचा श्वास; मायदेशात येताच ढसाढसा रडली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 19:05 IST2021-08-08T19:03:00+5:302021-08-08T19:05:33+5:30
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं १ सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्यपदक जिंकून ७ पदकांच्या कमाईसह पदकतालिकेत ४८ वे स्थान पटकावले.

Tokyo Olympic : ती पदकाचं स्वप्न घेऊन गेली होती, पण भारतात बहिणीनं घेतला अखेरचा श्वास; मायदेशात येताच ढसाढसा रडली!
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं १ सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्यपदक जिंकून ७ पदकांच्या कमाईसह पदकतालिकेत ४८ वे स्थान पटकावले. ऑलिम्पिक स्पर्धेतील ही भारताची आतापर्यंतची सर्वाधिक पदकांची कमाई ठरली. काही भारतीयांना थोडक्यात पदक गमवावे लागले. भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केलं अन् १५ ऑगस्टला ते सर्व ऑलिम्पियनपटूंना लाल किल्ल्यावर भेटणार आहेत. अशात भारताच्या धावपटूवर दुःखाचं डोंगर कोसळलं.
सुभा वेंकटरमन आमि धनलक्ष्मी शेखर या भारतीय खेळाडू शनिवारी तामिळनाडू येथील तिरुचिरापल्ली या त्यांच्या घरी परतल्या. त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले, परंतु या आनंदाचा शेवट अश्रूंनी झाला. मायदेशात परतलेल्या धनलक्ष्मीला तिच्या बहिणीच्या निधनाची बातमी समजली अन् तिला भावना आवरता आल्या नाहीत. धनलक्ष्मी टोकियोत भारताला पदक मिळवून देण्याचे स्वप्न पाहत असताना इथे मायदेशात तिच्या बहिणीचं निधन झालं, परंतु तिच्या आईनं हे धनलक्ष्मीला कळू दिले नाही.
धनलक्ष्मीच्या कारकिर्दीत तिच्या बहिणीचा खूप मोठा वाटा होता. सुभा ही भारताच्या मिश्र ४ बाय ४०० मीटर शर्यतीतील सदस्य होती, तर धनलक्ष्मी राखीव खेळाडूंमध्ये होती.