भारतीय मॉडेलने घेतली शॉन टेंटची 'विकेट'
By Admin | Updated: June 21, 2014 18:46 IST2014-06-21T18:46:30+5:302014-06-21T18:46:30+5:30
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज शॉन टेंटला एका भारतीय मॉडेलने 'क्लीन बोल्ड' केले असून दोघांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत लग्न केले आहे.

भारतीय मॉडेलने घेतली शॉन टेंटची 'विकेट'
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २१ - आपल्या गोलंदाजांनी फलंदाजांची विकेट घेणारा ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज शॉन टेंट आता विवाहबंधनात अडकला आहे. विशेष म्हणजे टेंटला एका भारतीय मॉडेलने 'क्लीन बोल्ड' केले असून दोघांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत लग्न केले आहे.
ऑस्ट्रेलियातर्फे खेळणारा शॉन टेंट आयपीएल सामन्यांदरम्यान भारतातीच मॉडेल माशूम सिंघाला भेटला होता. गेल्या सात वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. दोन दिवसांपूर्वी टेंटने मुंबईत भारतीय पद्धतीने माशूमाशी लग्न केल्याचे समजते. या लग्नसोहळ्याला भारतीय क्रिकेटपटू झहीर खान आणि युवराज सिंग हे दोघे उपस्थित होते.
टेंटने ३ टेस्ट, ३५ वनडे सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये तो खेळत होता. मात्र २०१४ मध्ये टेंटवर एकाही संघमालकाने बोली न लावल्याने तो आयपीएलपासून दुरावला होता. तर २०११ मध्ये विश्वचषकात त्याने भारताविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता