शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! फिलीपिन्समध्ये भारतीय कबड्डी प्रशिक्षकाची गोळ्या घालून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 13:10 IST

कबड्डी प्रशिक्षक गुरप्रीत सिंग गिंद्रू (43) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

नवी दिल्ली : पंजाबच्या मोगा येथील कबड्डी प्रशिक्षक गुरप्रीत सिंग गिंद्रू (43) यांची मंगळवारी फिलिपाइन्सच्या राजधानी शहरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येची माहिती मनेला पोलिसांनी दिली आहे. कबड्डी प्रशिक्षक गुरप्रीत सिंग हे चार वर्षांपूर्वी आपल्या उदरनिर्वाहासाठी फिलिपाइन्सला गेले होते. 43 वर्षीय सिंग कामावरून परतल्यानंतर अज्ञात हल्लेखोर त्यांच्या घरात घुसले आणि त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. मात्र, हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही, तसेच कबड्डी प्रशिक्षक गुरप्रीत यांची हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या का केली याचे कारणही समजू शकलेले नाही, असे मनिला पोलिसांनी स्थानिक माध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

भारतीय नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यात वाढ विदेशात भारतीय नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दुसऱ्या एका घटनेत कॅनडातील ओंटारियोमध्ये पंजाबमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. भारतीय वंशाचे नागरिक असलेले मोहित शर्मा (28) हे देखील कारच्या मागील सीटवर मृतावस्थेत आढळून आले. उल्लेखनीय बाब म्हणजे विदेशात भारतीय डायस्पोरा विरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यांच्या बातम्यांमध्ये वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यूकेमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना चाहत्यांमध्ये संघर्षाने संपल्यानंतर लीसेस्टर शहरात निषेध, दंगल आणि तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Kabaddiकबड्डीCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू