भारतीय फुटबॉल संघाची हाराकिरी
By Admin | Updated: September 16, 2014 01:36 IST2014-09-16T01:36:43+5:302014-09-16T01:36:43+5:30
येथे सुरू असलेल्या आशियाई स्पध्रेतील ग्रुप जी मधील पहिल्या लढतीत भारतीय पुरुष फुटबॉल संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

भारतीय फुटबॉल संघाची हाराकिरी
इंचियोन : येथे सुरू असलेल्या आशियाई स्पध्रेतील ग्रुप जी मधील पहिल्या लढतीत भारतीय पुरुष फुटबॉल संघाला पराभवाचा सामना करावा लागला. संयुक्त अमिराती अरब (युएई) संघाने त्यांचा 5-क् असा धुव्वा उडविला.
सामन्याच्या सुरुवातीचा काही काळ वर्चस्व गाजवणा:या भारतीय संघाला 15व्या मिनिटाला पहिला धक्का बसला. युएईच्या सईद अल्काथीरीने गोल करून खाते उघडले. या धक्क्यातून सावरण्याआधीच अल्काथीरीने हेडरद्वारे अप्रतिम गोल करून ही आघाडी 2-क् अशी मजबूत केली. भारतीय कर्णधार सुनील छेत्री
याने प्रतिस्पर्धी संघाच्या क्षेत्रत जाऊन संघर्ष केला; परंतु त्याला गोल करण्यात यश आले नाही. 2क्व्या मिनिटाला अल अहबाबीने गोल करून ही आघाडी 3-क् अशी आणखी भक्कत करत पहिल्या हाफमध्ये वर्चस्व गाजवले. युएईच्या या धमाकेदार कामगिरीने भारताचे प्रशिक्षक विम कोवरमन्स निराश दिसले. पहिल्या हाफपूर्वीच्या दोन मिनिटात भारताने आक्रमक खेळ केला. प्रीतम कोटल आणि लालरिंडींका राल्टे यांचा गोल करण्याचे प्रयत्न युएईच्या गोलकिपरने हाणून पाडले.
दुस:या हाफमध्ये राल्टे याच्या जागी प्रशिक्षकांनी प्रोणय हल्देर याला मैदानावर आणले. अवघ्या तीन मिनिटांच्या कालावधीत प्रोणयकडून गोल करण्याचा प्रयत्नही फसला. 64व्या मिनिटाला अल्काथीरीने गोल करून हॅट्ट्रिक साजरी केली.
भारत संघर्ष करत होता; पंरतु त्यांच्या वाटय़ाला यश येतच नव्हते. 84व्या मिनिटाला अल अहबाबीने दुसरा गोल करून युएईच्या विजयावर 5-क् अशी मोहोर उमटवली. भारताचा पुढील मुकाबला 22 तारखेला जॉर्डन संघाशी होणार आहे. (वृत्तसंस्था)
राष्ट्रकुलमुळे अपेक्षा वाढल्या : दीपा
नवी दिल्ली : ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत महिला जिम्नॅटिक्स स्पर्धेत कांस्य मिळविल्यामुळे दक्षिण कोरियात होणा:या आशियाई स्पर्धेत माङयाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे या स्पर्धेतही भारताचा पदक मिळविण्याचा प्रयत्न राहील, असे मत भारतीय महिला जिम्नॅस्टिक दीपा करमाकर हिने व्यक्त केले आह़े दीपाने राष्ट्रकुलमध्ये वाल्ट प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती़ जिम्नॅस्टिकमध्ये भारताचे हे पहिलेच पदक होत़े
दीपा म्हणाली, राष्ट्रकुलमधील कामगिरीमुळे माङयाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा वाढली आह़े त्यामुळे सध्या मी दबावात आह़े मात्र, असे असले तरी आशियाई स्पर्धेत सकारात्मक कामगिरी करण्यावर माझा भर राहणार आह़े
21 वर्षीय दीपाने पुढे सांगितले की, राष्ट्रकुल स्पर्धेत मुकाबला सोपा नव्हता़ आशियाई स्पर्धेतही अनुभवी प्रतिस्पर्धी असतील़ ग्लास्गोत इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या संघांचे आव्हान होत़े आता आशियाई स्पर्धेत चीन, कोरिया, जपानच्या खेळाडूंशी स्पर्धा राहणार आह़े या खेळाडूंविरुद्ध पदक मिळवायचे असेल, तर आतार्पयतचा सवरेत्कृष्ट खेळ करावा लागेल, असेही तिने म्हटले आह़े (वृत्तसंस्था)
यावेळी ‘सुवर्ण’ मिळविणार : सौरव घोषाल
नवी दिल्ली : गत दोन आशियाई स्पर्धेत एकेरीत कांस्यपदकांची कमाई केली होती़ मात्र, यावेळी दक्षिण कोरियात होणा:या आशियाई स्पर्धेत सुवर्ण मिळवायचे आह़े, असे मत भारताचा अव्वल मानांकन प्राप्त स्क्वॉश खेळाडू सौरव घोषाल यांने व्यक्त केले आह़े ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत दीपिका पिल्लिकल आणि जोत्स्ना चिनप्पा यांनी महिला दुहेरीत सुवर्णपदक जिंकल्यामुळे स्क्वॉशमध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत़
घोषाल याला आशियाई स्पर्धेच्या पहिल्या फेरीत बाय मिळाला आह़े आता सुवर्णपदकावर नाव कोरण्यासाठी त्याला आणखी चार सामने जिंकावे लागणार आह़े सौरव म्हणाला, या स्पर्धेत सुवर्ण मिळवायचे असल्यास प्रतिस्पर्धी पाकिस्तान, मलेशिया आणि हाँगकाँगच्या खेळाडूंविरुद्ध सवरेत्कृष्ट कामगिरी करावी लागणार आह़े
स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सौरवचा सामना पाकिस्तानच्या नसीर इकबालशी होऊ शकतो़ हा खेळाडू उलटफेर करण्यात माहीर आह़े विशेष म्हणजे आशियाई स्पर्धेत सौरवला कमी रॅकिंग असणा:या खेळाडूंशी झुंजावे लागणार आह़े, असे असले तरी या स्पर्धेत प्रत्येक खेळाडू सरस कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहील, असेही तो म्हणाला़ (वृत्तसंस्था)
रियो ऑलिम्पिकर्पयत कामगिरीत सातत्य राखण्याबाबत जितू आशावादी
नवी दिल्ली : जितू राय एका कॅलेंडर वर्षात पाच आंतरराष्ट्रीय पदके पटकाविणारा पहिला भारतीय नेमबाज ठरला आहे. 2क्16च्या रियो ऑलिम्पिकर्पयत कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक असल्याचे जितू म्हणाला. 25 वर्षीय जितूने गेल्या आठवडय़ात स्पेनमधील विश्व नेमबाजी स्पर्धेमध्ये रौप्य मिळवित ऑलिम्पिक पात्रता मिळविली.
राय म्हणाला, ‘रियो ऑलिम्पिक माङो मुख्य लक्ष्य असून, कसून मेहनत घेणार आहे.’ भारतीय सेनेत ज्युनिअर अधिकारी असलेल्या जितूने आगामी आशियाडमध्ये पदक पटकाविण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे.
इंचियोनला रवाना होण्यापूर्वी जितू म्हणाला, आशियाई स्पर्धा प्रतिष्ठेची असून, या स्पर्धेत छाप पाडण्यास उत्सुक आहे. या स्पर्धेत पदक पटकाविण्याचे लक्ष्य आहे.
जितू सध्या ‘आयएसएसएफ’ विश्व मानांकनामध्ये पाचव्या स्थानी आहे. जितूने यंदाच्या मोसमात सलग पाचव्यांदा आंतरराष्ट्रीय पदक पटकाविण्याची कामगिरी केली.
जितूने सहकारी नेमबाजांवर विश्वास व्यक्त करताना सांगितले की, भारताचे अनेक नेमबाज ऑलिम्पिक कोटा मिळविण्यात यशस्वी ठरतील. विश्व चॅम्पियनशिपनंतर विश्वकप आहे. आमच्या नेमबाजांची कामगिरी निश्चितच उल्लेखनीय ठरेल. स्पेनमध्ये अनेक नेमबाजांना थोडय़ा फरकाने ऑलिम्पिक कोटा मिळविण्यात अपयश आले. (वृत्तसंस्था)