भारतीय क्रिकेट योग्य दिशेने पुढे जात आहे
By Admin | Updated: October 10, 2015 01:09 IST2015-10-10T01:09:56+5:302015-10-10T01:09:56+5:30
निवृत्तीच्या दोन वर्षांनंतर महान फलंदाज सचिन तेंडुलरच्या मते, भारतीय क्रिकेट ‘योग्य दिशेने’ मार्गक्रमण करीत आहे; परंतु अजूनही सुधारणेला वाव असल्याची पुष्टीही

भारतीय क्रिकेट योग्य दिशेने पुढे जात आहे
नवी दिल्ली : निवृत्तीच्या दोन वर्षांनंतर महान फलंदाज सचिन तेंडुलरच्या मते, भारतीय क्रिकेट ‘योग्य दिशेने’ मार्गक्रमण करीत आहे; परंतु अजूनही सुधारणेला वाव असल्याची पुष्टीही त्याने जोडली आहे.
निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट ज्या दिशेने जात आहे त्यावर खूष आहे का, असे सचिनला विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला, ‘‘भारतीय क्रिकेट योग्य दिशेने मार्गक्रमण करीत आहे. तथापि, माझ्या दृष्टीने आम्हाला आणखी चांगले क्रिकेट खेळण्याची आवश्यकता आहे आणि सुधारण्यासाठी अजून वाव आहे. जोपर्यंत भूक राहील तोपर्यंत सर्व काही योग्य मार्गावर असेल.’’
तुम्ही तुमची एकाग्रता भंग होऊ देऊ शकत नाहीत, कारण तुम्हाला देश पाहत असतो. तुम्हाला अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खूप कटिबद्धतेची गरज असते, असे सांगतानाच सचिनने भारताचे सध्याचे फलंदाज
फिरकी गोलंदाजाविरुद्ध चांगले खेळत नाहीत, ही धारणा खोटी असल्याचे स्पष्ट केले.
या ४२ वर्षीय माजी महान फलंदाजाने त्याच्या जीवनातील दुसऱ्या डावावर समाधान व्यक्त केले.
तो म्हणाला, ‘‘सर्वांत पहिले काही बाबींमध्ये लक्ष्य प्राप्त करणे, सामना जिंकणे आणि संघाच्या आवश्यकतेनुसार काम करण्याशी निगडित असतात. मी माझ्या जीवनातील दुसरा डावात पूर्णपणे समाधानी आहे. माझी उपेक्षित लोकांसाठी काही करण्याची इच्छा आहे. काही मर्यादेपर्यंत असे करण्यात मी यशस्वी झाल्याचे खूप समाधान वाटत आहे.’’
क्रिकेटपासून वेगळे होण्याची भावना निर्माण झाली का, असे विचारले असता तेंडुलकर म्हणाला, ‘‘नाही. क्रिकेटपासून वेगळे झाल्याची तशी कोणतीही भावना नाही. मी नेहमीच खेळाशी प्रेम करीत राहणार आहे. तथापि, मी नियमितपणे क्रिकेट सामना पाहू शकेन, हे सांगता येणार नाही; परंतु वेळ मिळाल्यास मी त्यावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतो. सामन्यात रोमहर्षकता असेल तरी मी पाहतो. जेव्हा मी घरी असतो तेव्हा अर्जुन आणि अंजली माझ्यासोबत सामना पाहतात आणि हा खेळ खेळल्यामुळे काय होणार आहे, हे मला माहीत असते.’’(वृत्तसंस्था)
मला असे वाटत नाही. इंडियन प्रिमीयर लीगमुळे परदेशातील खेळाडूंना मदत मिळत आहे. याआधी परदेशातील खेळाडूंना भारतात खेळण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. आता प्रत्येक देशातील चार किंवा पाच खेळाडू अथवा त्यापेक्षा अधिक आयपीएलमध्ये सहभागी होतात. प्रशिक्षकही भारतात बराच वेळ व्यतीत करीत आहे आणि ते भारतीय वातावारणाशी जुळवून घेत आहेत. आम्ही दरबन आणि पर्थमध्ये कसोटी सामने जिंकले, याचा अर्थ दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज खराब आहेत, असा होत नाही.
- सचिन तेंडुलकर