फिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 21:11 IST2018-12-10T21:10:04+5:302018-12-10T21:11:14+5:30
कोलकाता: भारतातील तीन बुद्धिबळपटूंवर फिलिपीन्समध्ये हल्ला झाल्याची घटना गेल्या रविवारी रात्री घडली. एशियन कॉन्टिनेंटल टूर्नामेंटमध्ये भाग घेण्यासाठी बुद्धिबळपटू विदित ...

फिलिपिन्समध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना स्थानिक गुंडांकडून मारहाण
कोलकाता: भारतातील तीन बुद्धिबळपटूंवर फिलिपीन्समध्ये हल्ला झाल्याची घटना गेल्या रविवारी रात्री घडली. एशियन कॉन्टिनेंटल टूर्नामेंटमध्ये भाग घेण्यासाठी बुद्धिबळपटू विदित गुजराती, अभिजीत कुंटे आणि ललित बाबू फिलिपीन्समध्ये दाखल झाले आहेत. हे तिघेही हॉटेलपासून 250 मीटर लांब पाणी विकत घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी येथील स्थानिक गुंडांनी त्यांना मारहाण केली. ही घटना मकाती शहरात घडली. दरम्यान, या घटनेची माहिती विदित गुजराती याने आपल्या फेसबुक पेजवरुन शेअर केली आहे.
विदित गुजरातीने म्हटले आहे की, आम्ही तिघे पाणी विकत घेण्यासाठी हॉटेलच्या बाहेर गेलो होतो. त्यावेळी ही घटना घडली. आमच्यावर हल्ला होईल असा विचार सुद्धा मनात आला नव्हता. ज्यावेळी हल्ला करण्यात आला. तेव्हा आम्ही तेथून पळ काढला. मात्र गुंडांनी आमचा पाठलाग केला. मात्र, आम्ही थोडक्यात बचावलो. परंतू, ही घडलेली घटना विसरण्याचा प्रयत्न करत आहोत.
याचबरोबर, एशियन कॉन्टिनेंटल टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती येथील पोलिसांना सुद्धा नव्हती. त्यामुळे याठिकाणी सुरक्षा मिळू शकली नाही. तसेच, हॉटेलमधील जेवण खराब होते आणि त्याठिकाणी वाय-फायची सुद्धा सोय नव्हती, असे विदित गुजरातीने म्हटले आहे.