शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

वाहनचालकाची कन्या बनणार भारतीय बॉक्सिंगचे भविष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 3:59 AM

गुवाहाटी : मिझोरामच्या दुर्गम भागात वास्तव्य करणारी १७ वर्षांची युवा खेळाडू भारतीय बॉक्सिंगचे भविष्य बनू पाहत आहे.

किशोर बागडे थेट गुवाहाटी येथून...गुवाहाटी : मिझोरामच्या दुर्गम भागात वास्तव्य करणारी १७ वर्षांची युवा खेळाडू भारतीय बॉक्सिंगचे भविष्य बनू पाहत आहे. वाहनचालकाच्या या मुलीने या खेळातील चार वर्षांच्या वाटचालीत प्रेरणादायी कामगिरी केली. वनलालरियात पुई असे तिचे नाव.येथील कर्मवीर नवीनचंद्र बार्डोलाय इनडोअर स्टेडियममध्ये रविवारी सुरू झालेल्या स्पर्धेदरम्यान ‘लोकमत’शी संवाद साधताना बॉक्सिंगमधील पदार्पणात आलेले अडथळे तिने कथन केले. तिच्या गावात सोयी-सुविधांचा अभाव असला तरी खेळात कामगिरी उंचावून गावाच्या हितासाठी काहीतरी करण्याचा निर्धार तिच्या बोलण्यातून जाणवला.वडील झेड. एच. झोलियाना हे सुमोचालक म्हणून नोकरी करतात. आई घरकाम करते. पाठीशी दोन लहान भाऊ आहेत. संसाराचा गाडा ओढण्यात आईची मदत करीत असताना वनलालरियात पुई शाळेत मुलांसोबत खेळताना भांडणाात त्यांना पुरून उरायची. त्यातूनच आठवीला असताना ती बॉक्सिंगकडे वळली. पुढे राजधानीचे ठिकाण असलेल्या आयजोल शहरात पुईला भारतीय क्रीडा प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळाला. तेव्हापासून पुईचे आयुष्यच बदलून गेले. ६० किलो गटात सध्याच्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीचा सामना तिला कोरियाच्या प्रतिस्पर्धीविरुद्ध खेळायचा असला तरी ती तितकीशी चिंताग्रस्त जाणवली नाही.राष्टÑीय ग्रामीण क्रीडा स्पर्धेत २०१४ मध्ये पदक जिंकल्यानंतर तिने कधीही मागे वळून बघितलेले नाही. यंदा नवी दिल्लीत झालेल्या पहिल्या यूथ बॉक्सिंग स्पर्धेत तिने आपल्या गटात सुवर्णपदक जिंकले होते. राष्टÑीय स्पर्धेत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य जिंकल्यानंतर आॅगस्ट महिन्यात सर्बियात झालेल्या गोल्डन ग्लोव्हज आंतरराष्टÑीय बॉक्सिंग स्पर्धेत पुईने देशासाठी सुवर्णमय कामगिरी करताच संभाव्य भारतीय संघासाठी तिची निवड झाली. कुटुंबासाठी आणि देशासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुई सध्या सरावात व्यस्त आहे. पदक मिळाल्यास राज्य सरकार मदतीला धावून येईल, तसेच लहान भावांच्या शिक्षणासाठी पैसा उभारता येईल, असे तिने सांगितले.शांत आणि संयमी असलेली पुई घरापासून दूर आहे. घरची आठवण येते का, असे विचारताच ती म्हणाली, ‘साईच्या केंद्रात सराव आणि अकरावीच्या शिक्षणाची तयारी अशी दैनंदिनी आहे, पण घरच्यांची आठवण अनेकदा भाावूक करून सोडते. प्रशिक्षकांच्या सूचनेनुसार मोबाईलवर अधिक बोलता येत नाही. आठवड्यात एकदाच संपर्क होतो. यामुळे अधिक भावनाप्रधान होण्याआधी मी मात्र ग्लोव्हज घालून सरावात व्यस्त होते.’>वनलालरियात पुई एआयबीए युवा महिला विश्व बॉक्सिंग स्पर्धेत ६० किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करेल. टोकिओ आॅलिम्पिकची आशा बाळगायची असेल तर हीच खरी संधी आहे, या निर्धारासह ती रिंगणात उतरणार आहे.

टॅग्स :boxingबॉक्सिंग