भारतीय गोलंदाज पुन्हा अपयशी
By Admin | Updated: July 2, 2014 00:15 IST2014-07-02T00:15:50+5:302014-07-02T00:15:50+5:30
सराव लढत : पहिल्या दिवशी डर्बिशायर ५ बाद ३२६

भारतीय गोलंदाज पुन्हा अपयशी
स ाव लढत : पहिल्या दिवशी डर्बिशायर ५ बाद ३२६डर्बिशायर : पहिल्या सराव सामन्यात अपयशी ठरलेल्या भारतीय गोलंदाजांना दुसर्या लढतीतही विशेष कामगिरी करता आली नाही़ या लढतीत पहिल्या दिवस अखेर डर्बिशायरने ९० षटकांत ५ बाद ३२६ धावांपर्यंत मजल मारली़ डर्बिशायरकडून बेन स्लेटर (५४), बिली गोडलेमॅन (६७), वेस डी़ (९५) आणि हेर्वी होसेन (नाबाद ५३) या चौघांनी शानदार अर्धशतके झळकावून भारतीय गोलंदाजांची दमछाक केली़ स्टलेर याने आपल्या खेळीत १२१ चेंडूंत ९ चौकार लगावले़ गोडलेमॅन याने १५९ चेंडंूत ८ चौकार खेचले़ तर वेस डी याने ९० चेंडूंला सामोरे जाताना १४ चौकार लगावले़ होसेन याने याने ८९ चेंडंूचा सामना करताना ८ वेळा चेंडू सीमेपार धाडला़ भारताकडून रवींद्र जडेजा हा सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला़ त्याने ११ षटकांत २७ धावा देत २ गडी बाद केले़ तर पंकज सिंह, ईश्वर पांडे, स्टअर्ट बिन्नी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला़ (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : डर्बिशायर ९० षटकांत ५ बाद ३२६़ (बेन स्लेटर ५४, बिली गोडलेमॅन ६७, वेस डी़ ९५, हेर्वी होसेन नाबाद ५३, सी़ ह्यज २३़ रवींद्र जडेजा २/३७़ पंकज सिंह १/६३)़