भारतीय अंध क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर

By Admin | Updated: May 22, 2015 19:28 IST2015-05-22T19:17:00+5:302015-05-22T19:28:01+5:30

२४ ते ३१ मे रोजी इंग्लंड येथे अंधांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघ सहभागी होणार आहे. त्यानंतर त्यांचा दौरा १ ते ५ जून रोजी बहरीन येथे सामन्यासाठी जाणार

Indian blind cricket team tour of England | भारतीय अंध क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर

भारतीय अंध क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर

>ऑनलाइन लोकमत
सुरत, दि. २२ - टी - २० सामन्यासाठी भारतातील अंध युवकांचा क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर जाण्यास सज्ज झाला आहे.
२४ ते ३१ मे रोजी इंग्लंड येथे अंधांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघ सहभागी होणार आहे. त्यानंतर त्यांचा दौरा १ ते ५ जून रोजी बहरीन येथे सामन्यासाठी जाणार असल्याचे क्रिकेट असोसिएशन ऑफ ब्लाइंड इंडियाने सांगितले आहे. .या संघाने १८ मे पासून वलसाडे येथे कसून सराव केला असल्याचे कर्णधार शेखर नायक याने सांगितले आहे. प्रादेशिक पातळीवरचे व गेल्या वर्षातील विश्वकप जिंकल्याने आत्मविश्वास दुणावला असल्याचेही शेखरने सांगितले असून त्यांच्या प्रशिक्षकांनी त्यांच्याकडून कसून सराव करून घेतला आहे. गेल्या वर्षातील विश्वकप जिंकल्याने ब्रिटन येथील दौऱ्याला महत्लप्राप्त झाले असल्याचे क्रिकेट असोसिएशन ऑफ ब्लाइंड इंडियाचे सचिव जी. किवदासन्नावर यांनी सांगितले आहे. 

Web Title: Indian blind cricket team tour of England