भारतीय फलंदाजी पुन्हा ढेपाळली!

By Admin | Updated: August 15, 2014 17:46 IST2014-08-15T17:43:45+5:302014-08-15T17:46:19+5:30

भारत विरूध्द इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. अवघ्या ३६ धावांत भारताचे आघाडीचे ५ फलंदाज स्वस्तात तंबुत परतले आहेत.

Indian batting again! | भारतीय फलंदाजी पुन्हा ढेपाळली!

भारतीय फलंदाजी पुन्हा ढेपाळली!

>३६ धावांत भारताचे ५ फलंदाज बाद 
ऑनलाइन टीम 
किया ओव्हल, दि. १५ - भारत विरूध्द इंग्लंड यांच्यात सुरू असलेली पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत भारतीय फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. अवघ्या ३६ धावांत भारताचे आघाडीचे ५ फलंदाज स्वस्तात तंबुत परतले आहेत. 
नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडच्या कर्णधारांने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला व भारताला फलंदाजी करण्यास पाचारण केले. फलंदाजीसाठी उतरलेला भारतीय संघाला सुरूवातीपासून इंग्लंड गोलंदाजांनी धक्के देण्यास सुरूवात केली.  सलामीला आलेली जोडी स्वस्तात बाद झाली. त्यानंतरही हा सिलसिला सुरूच राहिला. भारताकडून सर्वाधिक १८ धावा मुरली विजयने केल्या. गौतम गंभीर ०, चेतेश्वर पुजारा ४, विराट कोहली ६, अजिंक्य राहणे ०, धावा काढून तंबूत परतले आहेत. 

Web Title: Indian batting again!