शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बेल्जियम दौरा : भारताने दिला विश्वविजेत्यांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 00:24 IST

भारतीय पुरुष हॉकी संघाने जागतिक आणि युरोपिय विजेत्या बेल्जियमला पाचव्या व अखेरच्या सामन्यात ५-१ असे लोळवले.

एंटवर्प : भारतीय पुरुष हॉकी संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखताना जागतिक आणि युरोपिय विजेत्या बेल्जियमला पाचव्या व अखेरच्या सामन्यात ५-१ असे लोळवले. यासह भारतीयहॉकी संघाने बेल्जियम दौऱ्याची विजयी सांगता करतानाच एकही पराभव पत्करला नाही.जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या भारताने या दौºयात धमाकेदार कामगिरी करताना पाचही सामने जिंकले. पहिल्या सामन्यात बेल्जियमला २-० असे नमविल्यानंतर भारताने पुढील दोन सामन्यात स्पेनला ६-१ आणि ५-१ असे पराभूत केले. यानंतरचे दोन्ही सामने भारताने २-१, ५-१ अशा फरकाने जिंकले. मालिकेतील अखेरच्या सामन्यात सिमरनजीत सिंग (७वे मिनिट), ललित कुमार उपाध्याय (३५), विवेक सागर प्रसाद (३६), हरमनप्रीत सिंग (४२) आणि रमनदीप सिंग (४३) यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताचा विजय साकारला. मध्यरक्षक, बचावफळी, आक्रमक आणि गोलरक्षक अशा सर्वानीचआपापली जबाबदारी योग्यपणे सांभाळताना शानदार सांघिक खेळ केला.भारताच्या आक्रमणाला तोडिस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न केलेल्या बेल्जियमला अखेरपर्यंत भारताचे भक्कम संरक्षण भेदण्यात अपयश आले. बेल्जियमला सामन्यात तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने भक्कम बचाव करत यजमानांचे आक्रमक परतावून लावले. मात्र ३९व्या मिनिटाला भारताच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारलेल्या अलेक्झांडर हेंड्रिक्स याने गोल करत यजमानांचा पहिला गोल साकारला. मात्र यानंतर वर्चस्व राहिले ते केवळ भारतीयांचेच. आक्रमक व बचावफळी यांनी अप्रतिम ताळमेळ साधत यजमानांना पुनरागमनाची एकही संधी न देता बाजीमारली.

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत