भारत इतिहास घडविणार ?
By Admin | Updated: September 17, 2014 01:54 IST2014-09-17T01:54:58+5:302014-09-17T01:54:58+5:30
भारतीय खेळाडू दक्षिण कोरियातील इंचियोन येथे 19 सप्टेंबरपासून होणा:या आशियाई क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त पदके जिंकून नवा इतिहास घडविण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत.

भारत इतिहास घडविणार ?
नवी दिल्ली : भारतीय खेळाडू दक्षिण कोरियातील इंचियोन येथे 19 सप्टेंबरपासून होणा:या आशियाई क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त पदके जिंकून नवा इतिहास घडविण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत.
भारताने 1951 मध्ये दिल्लीत पहिल्या आशियाई स्पर्धेचे यजमानपद भूषविले होत़े तेव्हा या स्पर्धेत 15 सुवर्ण, 16 रौप्य आणि 2क् कास्यपदकांसह 51 पदकांची कमाई करताना पदकतालिकेत दुसरा क्रमांक मिळविला होता़ ही आशियाई स्पर्धेतील भारताची आतार्पयतची सवरेत्कृष्ट कामगिरी आह़े
चार वर्षापूर्वी ग्वांग्झू येथील आशियाई स्पर्धेत भारताने 14 सुवर्ण, 17 रौप्य आणि 34 कांस्यपदकांसह एकूण 65 पदकांची कमाई केली होती़ सुवर्णपदकांचा विचार केल्यास ही भारताची दुसरी सरस कामगिरी होती, तर एकूण पदकांचा विचार केल्यास ही भारताची सर्वश्रेष्ठ कामगिरी राहिली आह़े
भारताने यापूर्वी 1982 मध्ये दिल्लीतील आशियाई स्पर्धेत 13 सुवर्ण, 19 रौप्य आणि 25 कांस्यासह एकूण 57 पदके पटकावली होती़ पदकांच्या तुलनेत भारताची ग्वांग्झूमधील आशियाई स्पर्धेपूर्वी ही सवरेत्कृष्ट कामगिरी होती़ मात्र, भारताने 2क्1क् मध्ये हा विक्रम मागे टाकला होता़
दक्षिण कोरियात 1986 मध्ये पहिल्यांदाच आशियाई स्पर्धा झाली होती़ तेव्हा भारताने या स्पर्धेत 5 सुवर्ण, 9 रौप्य आणि 23 कांस्यपदकांसह 37 पदकांवर नाव कोरले होत़े त्यानंतर दुस:यांदा कोरियात 2क्क्2 मध्ये आशियाई स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत़े त्यात भारताने 11 सुवर्ण, 12 रौप्य आणि 13 कांस्य पदके मिळविली होती.
19 सप्टेंबरपासून सुरूहोणा:या आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडू आपले जुने विक्रम मागे टाकून नवा इतिहास घडविण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील़ भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) आगामी आशियाई स्पर्धेत भारत जवळपास 7क् पदके आपल्या नावे करील, असा विश्वास व्यक्त केला आह़े