भारताला १२ पदके मिळतील...

By Admin | Updated: August 5, 2016 04:00 IST2016-08-05T04:00:59+5:302016-08-05T04:00:59+5:30

आॅलिम्पिकमध्ये ११८ खेळाडूंचे भारतीय पथक किमान १२ पदके जिंकेल, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे.

India will get 12 medals ... | भारताला १२ पदके मिळतील...

भारताला १२ पदके मिळतील...


रिओ : आॅलिम्पिकमध्ये ११८ खेळाडूंचे भारतीय पथक किमान १२ पदके जिंकेल, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. प्राईसवॉटरहाऊस कूपर्स या नामवंत रेटिंग एजन्सीने हे भाकीत केले.
भारताने लंडन आॅलिम्पिकमध्ये ८३ खेळाडू पाठविले होते. त्यांनी दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांची कमाई केली. त्यावेळी देखील प्राईसवॉटरहाऊस कूपर्सने सहा पदकांचेच भाकीत केले होते. यंदा सहा पदकांची भर घातली. पदकांची ही संख्या एखाददुसरी इकडेतिकडे होऊ शकेल, असेही म्हटले आहे. देशाची अर्थव्यवस्था, मागच्या दोन आॅलिम्पिकमधील कामगिरी तसेच देश यजमान आहे किंवा नाही या आधारे पदक मिळण्याचे भाकीत वर्तविण्यात येते.
लंडनमध्ये अमेरिकेला एकूण ११३ पदके मिळतील, असे भाकीत करण्यात आले होते. अमेरिकेने १०३ पदके तर अमेरिकेला आव्हान देणाऱ्या चीनने ८७ पदकांचे भाकीत केल्यानंतरही ८८ पदके जिंकली. यजमान ब्रिटनबद्दल ५४ पदकांचे भाकीत होते पण त्यांनंी ६५ पदके पटकविली. रशियासाठी ७३ पदकांचे भाकीत करण्यात आले होते पण रशियाने ८१ पदके जिंकली.
(क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: India will get 12 medals ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.