भारत विश्वविजेतेपद राखणार : मदनलाल यांना विश्वास
By Admin | Updated: March 10, 2015 01:17 IST2015-03-10T01:17:58+5:302015-03-10T01:17:58+5:30
भारतीय संघाच्या कामगिरीत अचानक बदल झाल्यामुळे १९८३ च्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य असलेले मदनलाल प्रभावित झाले आहेत.

भारत विश्वविजेतेपद राखणार : मदनलाल यांना विश्वास
ग्रेटर नोएडा : भारतीय संघाच्या कामगिरीत अचानक बदल झाल्यामुळे १९८३ च्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य असलेले मदनलाल प्रभावित झाले आहेत. भारतीय संघ या वेळी विश्वविजेतेपद कायम राखण्यात यशस्वी ठरेल, असा मला ९९ टक्के विश्वास वाटतो, असेही मदनलाल म्हणाले.
मदनलाल म्हणाले, ‘‘भारतीय संघाने आॅस्ट्रेलियातील कसोटी मालिका व तिरंगी मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर जोरदार पुनरागमन केले. भारतीय संघाच्या कामगिरीत अचानक बदल होऊ शकतो, याचे मला अधिक आश्चर्य वाटले. या कामगिरीमुळे भारतीय संघ जेतेपद राखण्यात यशस्वी ठरेल, असा मला ९९ टक्के विश्वास वाटतो. एखादा दिवस भारतीय संघासाठी वाईट असेल, त्यादिवशी त्या टक्क्याचा प्रश्न येईल. भारतीय संघाच्या कामगिरीमध्ये झालेल्या बदलाचे सर्व श्रेय संघाचे संचालक रवी शास्त्री व कोचिंग स्टाफला जाते. शास्त्री यांच्यासह कोचिंग स्टाफ बरीच मेहनत घेत आहेत.’’ भारतीय संघ गेल्या तीन महिन्यांपासून आॅस्ट्रेलियात आहे. खेळाडूंना तेथील परिस्थितीचा चांगला अनुभव मिळाला आहे.