भारताला ऑस्ट्रेलिया दौरा आव्हानात्मक असेल : मॅकग्रा
By Admin | Updated: August 21, 2014 01:01 IST2014-08-21T01:01:43+5:302014-08-21T01:01:43+5:30
इंग्लंडविरुद्ध कसोटीमध्ये भारतीय संघाची परिस्थिती पाहिली तर त्यांचा पुढील ऑस्ट्रेलिया दौरा खूप आव्हानात्मक असेल.

भारताला ऑस्ट्रेलिया दौरा आव्हानात्मक असेल : मॅकग्रा
नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्ध कसोटीमध्ये भारतीय संघाची परिस्थिती पाहिली तर त्यांचा पुढील ऑस्ट्रेलिया दौरा खूप आव्हानात्मक असेल. यातून जर त्यांना काही बोध घ्यायचा असेल तर त्यांना अनेक आघाडय़ांवर सुधारणा करावी लागणार असल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने वृत्तसंस्थेस सांगितले.
मॅकग्रा म्हणाला, जर भारतीय संघाची कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुध्द इंग्लंडप्रमाणोच राहिली, तर ती मालिका सुध्दा ते 4-क् ने गमावतील. भारतीय संघाच्या खेळाडूंना अनेक आघाडय़ांवर सुधारणा करावी लागणार आहे. त्यांचे क्षेत्ररक्षण, फलंदाजी, गोलंदाजी व त्यांच्यातील आत्मविश्वास या सर्वाच्याच बाबतीत विचार करावा लागणार आहे. या गोष्टींमध्ये जर त्यांनी पुढील काही दिवसांत सुधारणा करावी लागेल. वरुण अॅरोन, ईशांत शर्मा यांनासुध्दा थोडे काम करावे लागणार आहे. भुवनेश्वरला चांगली लेन्थ सापडली तर तो फलंदाजांसमोर भेदक होऊ शकतो.
(वृत्तसंस्था)