शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नीरज चोप्रानं ज्या स्पर्धेत सुवर्ण जिंकून इतिहास रचला, त्याच स्पर्धेत आज भारताच्या रिले टीमनं वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 12:22 IST

२०१६मध्ये पोलंड येथे झालेल्या जागतिक २० वर्षांखालील अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्णपदकाची कमाई करून इतिहास रचला होता.

२०१६मध्ये पोलंड येथे झालेल्या जागतिक २० वर्षांखालील अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रानं सुवर्णपदकाची कमाई करून इतिहास रचला होता. त्यानं ८६.४८ मीटर भालाफेक करून कनिष्ठ गटातील विश्ववक्रमाची नोंद केली होती. त्यानं ऑलिम्पिक पजक विजेत्या केशोर्न वॅलकॉट याचा २० वर्षांखालील स्पर्धेतील वर्ल्ड रेकॉर्ड मोडला होता. त्याच स्पर्धेत आज भारताच्या मिश्र रिले संघानं वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला, परंतु काही मिनिटांतच तो मोडला गेला.  आजपासून नैरोबी येथे सुरू झालेल्या जागतिक २० वर्षांखालील अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले संघानं हिट १ मध्ये विक्रमाची नोंद केली. त्यांनी ३ मिनिटे २३.३६ सेकंदाची वेळ नोंदवताना नायजेरियाचा ३ मिनिटे २४.३४ सेकंदांचा विक्रम मोडला. अब्दुल रझ्झाक, प्रिया मोहन, सम्मी आणि कपिल यांचा समावेश असलेल्या संघानं मारली अंतिम फेरीत धडक ( The Indian team (Abdul Razzaq, Priya Mohan, Summy & Kapil) tops the heats in the 4x400m mixed relay to reach the final #U20WorldChampionships)  हिट २ मध्ये नायजेरियानं ३ मिनिटे २१. ६६ सेकंदाची वेळ नोंदवून वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला. झेक प्रजासत्ताकनं ३ मिनिटे २४.१५ सेकंदाची वेळ नोंदवली.

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्रा