भारत ‘अ’ संघाने मालिका गमावली

By Admin | Updated: September 19, 2016 03:59 IST2016-09-19T03:59:55+5:302016-09-19T03:59:55+5:30

दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या चौथ्या व अखेरच्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ शक्य झाला नाही.

India 'A' team lost the series | भारत ‘अ’ संघाने मालिका गमावली

भारत ‘अ’ संघाने मालिका गमावली


ब्रिस्बेन : भारत ‘अ’ आणि आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघांदरम्यानच्या दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्याच्या चौथ्या व अखेरच्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ शक्य झाला नाही. हा सामना अनिर्णीत राहिला. यजमान संघाने पहिल्या लढतीत विजय मिळवताना दोन सामन्यांच्या मालिकेत १-० ने सरशी साधली. आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाने याच मैदानावर गेल्या आठवड्यात पहिल्या लढतीत तीन गडी राखून विजय मिळवला होता.
भारत ‘अ’ संघाची तिसऱ्या दिवसअखेर ४ बाद १५८ अशी स्थिती होती. डावाने पराभव टाळण्यासाठी भारताला १०८ धावांची गरज होती. भारत ‘अ’ संघाचा पहिला डाव १६९ धावांत संपुष्टात आला. प्रत्युत्तरात खेळताना आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाने पहिल्या डावात ४३५ धावांची दमदार मजल मारली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: India 'A' team lost the series