भारत-पाक सलामीला भिडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 09:46 IST2024-12-19T09:43:40+5:302024-12-19T09:46:24+5:30

स्पर्धा आयोजकांनी बुधवारी ही माहिती दिली.

india pakistan to match in opening of kho kho competition | भारत-पाक सलामीला भिडणार

भारत-पाक सलामीला भिडणार

नवी दिल्ली: पुढील वर्षी रंगणाऱ्या पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत यजमान भारत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. स्पर्धा आयोजकांनी बुधवारी ही माहिती दिली.

नवी दिल्ली येथे १३ ते १९ जानेवारीदरम्यान रंगणाऱ्या या विश्वचषक खो-खो स्पर्धेत किमान २४ देशांनी सहभाग घेतल्याचे निश्चित झाले आहे. स्पर्धेतील सामने येथील इंदिरा गांधी बंदिस्त स्टेडियम आणि नोएडा बंदिस्त स्टेडियममध्ये होतील.

खो-खो विश्वचषकचे सीईओ विक्रम देव यांनी सांगितले की, 'स्पर्धेतील साखळी सामने १३ ते १६ जानेवारीदरम्यान रंगतील. स्पर्धेतील उ‌द्घाटनाचा सामना भारत- पाकिस्तान असा होईल. १७ जानेवारीला उपांत्यपूर्व, १८ जानेवारीला उपांत्य व १९ जानेवारीला अंतिम सामना रंगेल.'

 

Web Title: india pakistan to match in opening of kho kho competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Kho-Khoखो-खो