गूगल डूडलवरही भारत-न्युझीलँड सामन्याचा प्रभाव

By admin | Published: March 15, 2016 08:58 AM2016-03-15T08:58:10+5:302016-03-15T09:01:43+5:30

टी-२० विश्वचषकात आज यजमान भारतीय संघाची लढत न्युझीलँडविरोधात होणार असून सर्वांनाच या सामन्याची उत्सुकता आहे, यापार्श्वभूमीवर गूगलनेही एक खास डूडल तयार केले आहे.

India-New Zealand match effect on Google doodle | गूगल डूडलवरही भारत-न्युझीलँड सामन्याचा प्रभाव

गूगल डूडलवरही भारत-न्युझीलँड सामन्याचा प्रभाव

Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १५ - टी-२० विश्वचषकात आज यजमान भारतीय संघाची लढत न्युझीलँडविरोधात होणार असून सर्वांनाच या सामन्याची उत्सुकता लागून राहिली आहे. या सामन्यातील थरार अनुभवण्यास क्रिकेट रसिक सज्ज झाले असून सोशल नेटवर्किंग साईट्सवरही भारत वि. न्युझीलँड सामना ट्रेंडिंगमध्ये आहे. आणि हेच लक्षात घेऊन गूगलनेही खास 'डूडल' तयार करत ते 'भारत वि. न्युझीलँड' सामन्यास डेडिकेट केले आहे. 
गूगल सर्चची विंडो उघडताच आपल्याला टगडद व फिक्या निळ्या रंगाच्या ( न्युझीलँड व भारतीय संघाच्या गणवेशाचे रंग) दोन बॅट्स व त्यामध्ये टी-२० विश्वचषक करंडक' असे चित्र पहायला मिळते. 'The Black Caps take on the Men in Blue' असेही त्यावर लिहीले आहे. या डूडलवर क्लिक केल्यास आपल्याला थेट मॅचचे शेड्यूल पहायला मिळते. 
नागपूरच्या मैदानावर आज संध्याकाळी साडेसातला भारत वि. न्युझीलँडचा सामना रंगणार असून जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात असलेल्या भारतीय संघाला अलीकडच्या यशस्वी कामगिरीच्या बळावर आजची सलामीची लढत जिंकून विजयी वाटचाल करण्याचे आव्हान असेल. या सामन्यासाठी असलेली खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असल्याचे मानले जात आहे.
आशिया चषक चॅम्पियन, जबर फॉर्ममध्ये असलेला भारतीय संघ स्थानिक चाहत्यांच्या पाठिंब्याच्या बळावर पहिला अडथळा कसा पार करतो, यावर भारताची स्पर्धेतील पुढील वाटचाल अवलंबून असेल. अपेक्षांच्या दडपणात असलेला भारतीय संघ टी-२०त अव्वल स्थानावर आहेच; शिवाय आशिया चषक जिंकून विश्वचॅम्पियनशिपसाठी सज्ज झाला आहे.
 
 

 

Web Title: India-New Zealand match effect on Google doodle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.