भारताने कास्य गमावले

By Admin | Updated: July 6, 2015 01:19 IST2015-07-06T01:19:15+5:302015-07-06T01:19:15+5:30

इंग्लंडने रियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाच्या बचाव फळीतील उणिवा स्पष्ट करीत रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत ५-१ ने शानदार विजय मिळवला.

India lost the bronze | भारताने कास्य गमावले

भारताने कास्य गमावले

एंटवर्प : इंग्लंडने रियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाच्या बचाव फळीतील उणिवा स्पष्ट करीत रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत ५-१ ने शानदार विजय मिळवला आणि एफआयएच हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनल्समध्ये कास्यपदकाचा मान मिळवला.
भारताचा बचाव सलग दुसऱ्या लढतीतही ढेपाळला. इंग्लंडने पहिल्या क्वॉर्टरमध्ये आघाडी मिळविल्यानंतर तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारतीय बचावला एकापाठोपाठ एक हादरे दिले. एलेस्टेयर ब्रागडनने ११ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवत इंग्लंडचे खाते उघडले. अ‍ॅशले जॅक्सनने ३७ व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. अ‍ॅडम डिक्सनने ४२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर इंग्लंडतर्फे तिसरा गोल नोंदवला. बॅरी मिडल्टनने ४४ व ४५ व्या मिनिटाला सलग दोन गोल नोंदवत इंग्लंडला ५-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. भारतातर्फे एकमेव गोल सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला रूपदिंरपाल सिंगने पेनल्टी कॉर्नरवर नोंदवला. भारतीय गोलकीपर पी. आर. श्रीजेशने चांगला बचाव केला; पण त्याला योग्य साथ लाभली नाही. या लाजिरवाण्या पराभवासह भारताची या स्पर्धेतील मोहीम संपली.
याआधी, फ्रान्सने पाकिस्तानचा २-१ ने पराभव करीत सातवे स्थान पटकावले, तर आयर्लंडने मलेशियाविरुद्ध ४-१ ने विजय मिळवत पाचवे स्थान पटकावले. (वृत्तसंस्था)

Web Title: India lost the bronze