भारताला अष्टपैलूंची उणीव
By Admin | Updated: August 24, 2014 01:03 IST2014-08-24T01:03:15+5:302014-08-24T01:03:15+5:30
टीम इंडियासमोर विजयाचे आव्हान असेल़ कसोटी मालिकेप्रमाणोच वन-डे सिरीजमध्येही भारताला अष्टपैलू खेळाडूंची उणीव भासणार, हे निश्चित आह़े

भारताला अष्टपैलूंची उणीव
पटियाला : कसोटी मालिकेत इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर सोमवारपासून होणा:या वन-डे मालिकेत टीम इंडियासमोर विजयाचे आव्हान असेल़ कसोटी मालिकेप्रमाणोच वन-डे सिरीजमध्येही भारताला अष्टपैलू खेळाडूंची उणीव भासणार, हे निश्चित आह़े
1983मध्ये लॉर्ड्समध्ये विश्वकप जिंकून क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव नोंदवणा:या भारतीय संघात 4 अष्टपैलू खेळाडूंचा समावेश होता़ कपिल देव, रवी शास्त्री, कीर्ती आझाद आणि मदनलाल या अष्टपैलू खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर भारताने विश्वकप आपल्या नावे केला होता़
सध्या कामगिरीत सातत्य राखणा:या एकाही अष्टपैलू खेळाडूचा भारतीय संघात समावेश नाही़ सोमवारपासून सुरू होणा:या वन-डे मालिकेतील भारतीय संघात आऱ आश्विन, रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना हे तीन अष्टपैलू खेळाडू आहेत़
आश्विन आणि रवींद्र जडेजा आपल्या गोलंदाजीवर विशेष भर देतात; मात्र वेळप्रसंगी ते फलंदाजीतही चमक दाखवतात़ असे असले तरी त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही़
इंग्लंडविरुद्ध आश्विनला दोन कसोटी सामन्यांत संधी मिळाली
होती़ त्याने 2 कसोटीत 35़33 च्या सरासरीने 1क्6 धावा आणि 3 बळी मिळविले होते, तर जडेजाने 4 सामन्यांत 177 धावा आणि 9 गडी बाद
केले होत़े त्यामुळे वन-डे मालिकेत त्यांच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल़
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी करण्याचा अनोखा विक्रम आपल्या नावे केला होता़ तोसुद्धा वन-डेत अष्टपैलू कामगिरी करू शकतो़ विशेष म्हणजे, आगामी आयसीसी वर्ल्डकपच्या पाश्र्वभूमीवर भारताला संघात जास्त फेरबदल करणो महागात पडू शकत़े (वृत्तसंस्था)
4लंडन : आगामी वन-डे विश्वकपच्या पाश्र्वभूमीवर भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारी वन-डे मालिका महत्त्वाची आहे, असे मत इंग्लंडचे राष्ट्रीय निवडकर्ते एंगस फ्रेजर यांनी व्यक्त केले आह़े
4फ्रेजर म्हणाले, ‘‘इंग्लंडला सत्रच्या सुरुवातीला श्रीलंकेकडून मात खावी लागली होती, तर नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडने भारतावर सरशी साधली होती. त्यामुळे वन-डे मालिकेत दोन्ही संघ आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असतील़
4आगामी वन-डे मालिकेसाठी एलेक्स हेल्सला कर्णधार अॅलिस्टर कुकसोबत डावाची सुरुवात करण्याची संधी असेल़ स्टीव्हन फिनला स्टुअर्ट ब्रॉडच्या जागी संघात स्थान देण्यात आले आह़े’’
4फ्रेजर पुढे म्हणाले, ‘‘आता सर्वच संघांनी आगामी विश्वकपची तयारी सुरू केली आह़े भविष्यात आम्ही सहा ते सात खेळाडूंना संधी देऊन त्यांची विश्वकपसाठी तयारी करून घेऊ शकतो़
4आमच्यासाठी भारतासह ऑस्ट्रेलियात होणारी तिरंगी मालिकाही महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितल़े दरम्यान, भारतीय संघात संजू सॅमसन आणि कर्ण शर्मासारखे युवा खेळाडू आह़े विश्वकपपूर्वी त्यांच्या कामगिरीवर सर्वाची नजर असेल़ याव्यतिरिक्त धवल कुलकर्णी आणि मोहित शर्माला वन-डेत संधी दिली आह़े त्यांनाही आपली योग्यता सिद्ध क रावी लागणार आह़े’’