पराभवाची मालिका खंडित करण्यास भारत उत्सुक
By Admin | Updated: June 5, 2014 00:47 IST2014-06-05T00:47:29+5:302014-06-05T00:47:29+5:30
सलग दोन सामन्यांत पराभव स्वीकारणा:या भारतीय संघाला विश्वकप हॉकी स्पर्धेत गुरुवारी स्पेनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

पराभवाची मालिका खंडित करण्यास भारत उत्सुक
>हेग : सलग दोन सामन्यांत पराभव स्वीकारणा:या भारतीय संघाला विश्वकप हॉकी स्पर्धेत गुरुवारी स्पेनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. स्पेनच्या अनुभवी स्ट्रायकर्सपुढे भारतीय संघाची कसोटी लागणार आहे. बेल्जियम व इंग्लंडविरुद्ध अखेरच्या मिनिटाला गोल स्वीकारीत पराभव पत्करणा:या भारतीय संघाला स्पेनविरुद्धच्या लढतीत बचावावर भर द्यावा लागणार आहे. यापूर्वी उभय संघांदरम्यान 2क्13 च्या विश्व लीगच्या उपांत्य फेरीत लढत झाली होती. त्यात स्पेनने पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळविला होता.
गेल्या दोन वर्षामध्ये आर्थिक अडचणीमुळे स्पेनच्या संघाला प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये सहभागी होता आले नाही, पण त्याचा त्यांच्या कामगिरीवर विशेष प्रभाव पडलेला नाही. सॅन्टी फ्रेक्सिया व एडुअर्ड तबाऊ यांच्यासारखे दिग्गज खेळाडू भारताचा बचाव भेदण्यास सक्षम आहेत.
भारतीय संघाचे तांत्रिक संचालक रोलँच ओल्टमेन्स म्हणाले, की स्पेनचे दिग्गज खेळाडू भारतापुढे आव्हान निर्माण करण्यास सक्षम आहेत. भारतीय खेळाडू गेल्या दोन सामन्यांतील पराभव विसरून चमकदार कामगिरी करतील, अशी आशा आहे.
ओल्टमेन्स म्हणाले, की अलीकडच्या कालावधीत स्पेनविरुद्ध खेळण्याचा अनुभव नाही, पण त्यांच्या संघात दज्रेदार खेळाडूंचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध विजय मिळविण्यासाठी सांघिक कामगिरीची गरज आहे. भारतीय संघाची गेल्या दोन सामन्यांतील कामगिरी चांगली झाली, पण अखेरच्या क्षणी गोल स्वीकारावा लागल्यामुळे पराभव झाला.
निकाल निराशाजनक असला, तरी कामगिरीमुळे निराश नाही. भविष्यात संघाकडून अपेक्षित निकाल मिळतील. भारतीय संघ कामगिरीत सुधारणा करेल, अशी आशा आहे, असेही ओल्टमेन्स यांनी सांगितले.
स्पेनचे प्रशिक्षक सल्वाडोर इंडुरेन म्हणाले, की संघाने अद्याप उपांत्य फेरी गाठण्याची आशा सोडलेली नाही. प्रत्येक लढत अंतिम सामन्याप्रमाणो खेळणार आहे. भारतीय संघ कडवा प्रतिस्पर्धी आहे. आमच्या तुलनेत भारतीय संघाचे मानांकन सरस आहे. त्यामुळे ही लढत सोपी नाही.
स्पेन संघातील 8 खेळाडूंना 1क्क् पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. तुबाऊने 269 आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे, तर रेमन अलेग्रेने 256 सामने खेळले आहेत. डेव्हिड अलेग्रे याला 219 सामने खेळण्याचा अनुभव आहे. कर्णधार फ्रेक्सियाने 179 सामने खेळले आहेत, तर गोलकिपर कोर्तेसने 162 सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. रोक ओलावा व मिकेल डेल्लास यांना 1क्क् पेक्षा अधिक सामने खेळण्याचा अनुभव आहे. भारतीय संघात 1क्क् पेक्षा अधिक आंतरारष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव असलेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार सरदार सिंग (182 सामने), गुरबाज सिंग, व्ही. आर. रघुनाथ व एस. व्ही. सुनील यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
4भारताला या स्पर्धेत अद्याप गुणाचे खाते उघडता आलेले नाही. स्पेनने इंग्लंडला 1-1 ने बरोबरीत रोखत गुणाचे खाते उघडले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्पेनला 3-क् ने पराभव स्वीकारावा लागला.